मंडप परवानगीसाठी आज अखेरचा दिवस

मंडप परवानगीसाठी मुदतवाढ देण्याची मागणी बृहन्मुंबई गणेशोत्सव समितीने पालिकेकडे केली होती
मंडप परवानगीसाठी आज अखेरचा दिवस

लाडक्या गणरायाच्या स्वागतासाठी गणेशभक्तांमध्ये लगबग सुरू असून मंडप परवानगीसाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. मंडप परवानगीसाठी शुक्रवार २६ ऑगस्ट अखेरचा दिवस आहे. मंडप परवानगीसाठी मुदतवाढ देण्याची मागणी बृहन्मुंबई गणेशोत्सव समितीने पालिकेकडे केली होती.

सहा दिवसांवर बाप्पाचे आगमन आले असून मंडप परवानगीसाठी मुंबई महापालिकेकडे अर्ज करण्यासाठी एक खिडकी योजना सुरू करण्यात आली आहे. २३ ऑगस्ट ही अर्ज करण्याची शेवटची तारीख होती. मात्र अनेक गणेशोत्सव मंडळ परवानगीच्या प्रतीक्षेत असल्याने यावरून वाद निर्माण होण्याची शक्यता होती. या पार्श्वभूमीवर परवानगी न मिळालेल्या मंडळांसाठी मुदत वाढवून देण्याच्या मागणीचे निवेदन गणेशोत्सव मंडळांच्या वतीने समन्वय समितीचे अध्यक्ष नरेश दहिबावकर यांनी उपायुक्त हर्षद काळे यांना दिले होते. यावर पालिका प्रशासनाने तातडीने कार्यवाही करून शुक्रवार २६ ऑगस्टपर्यंत अर्ज करण्याची मुदत वाढवून दिल्याचे पालिकेचे उपायुक्त हर्षद काळे यांनी दिली.

दरम्यान, ऑनलाइन सुविधा बृहन्‍मुंबई महापालिकेच्‍या portal.mcgm.gov.in या वेब पोर्टलवर मराठी व इंग्रजी या दोन्‍ही भाषांमध्‍ये उपलब्‍ध आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in