
मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि मस्जिद बंदर स्थानकादरम्यान कर्नाक उड्डाणपुलाचा दुसरा स्पॅन उभारणीच्या कामासाठी मध्य रेल्वेने विशेष ब्लॉक घेतला आहे. २५ आणि २६ जानेवारी, ३१ जानेवारी ते २ फेब्रुवारीच्या मध्यरात्री ५ विशेष वाहतूक ब्लॉक घेण्यात येणार आहेत. या ब्लॉकमुळे मुख्य मार्ग, हार्बर मार्गावरील लोकल आणि एक्स्प्रेस गाड्यांवर परिणाम होणार आहे.
कर्नाक उड्डाणपुलाचा दुसऱ्या स्पॅनच्या कामासाठी शनिवार २५ जानेवारीला रात्री ११.३० ते पहाटे ५.३० या वेळेत भायखळा आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावर आणि डाऊन जलद मार्गावर तर वडाळा रोड ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दरम्यान अप आणि डाऊन हार्बर मार्गावर ब्लॉक घेण्यात येणार आहे. यामुळे मुख्य मार्गावरील भायखळा आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकांदरम्यान आणि हार्बर मार्गावरील वडाळा रोड आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकांदरम्यान उपनगरीय सेवा उपलब्ध राहणार नाहीत. त्यामुळे अप आणि डाऊन उपनगरीय सेवा ठाणे, कुर्ला, परळ आणि भायखळा या स्थानकांवर रद्द होतील. हार्बर लाइनवरील अप आणि डाऊन उपनगरीय सेवा वडाळा रोड स्थानकावर रद्द होतील.
२६ जानेवारी रोजी रात्री १२.३० ते पहाटे ३.३० वाजेपर्यंत ब्लॉक असेल. भायखळा आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दरम्यान धीम्या आणि डाऊन जलद मार्गावर ब्लॉक असेल. तर हार्बर मार्गावर - वडाळा रोड आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दरम्यान ब्लॉक असेल.
ब्लॉक काळात मुख्य मार्गावरील भायखळा ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकांदरम्यान आणि हार्बर लाइनवरील वडाळा रोड आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकांदरम्यान उपनगरीय सेवा उपलब्ध राहणार नाहीत. मुख्य मार्गावरील अप आणि डाऊन उपनगरीय सेवा ठाणे, कुर्ला, परळ आणि भायखळा स्थानकांवर शॉर्ट टर्मिनेट/ ऑरिगजिनेट होतील. हार्बर लाइनवरील अप आणि डाऊन उपनगरीय सेवा वडाळा रोड स्टेशनवर बंद होतील.