अमन लॉज-माथेरान शटल सेवेला पर्यटकांची पसंती ;८ महिन्यांत साडेतीन लाख प्रवाशांनी केला प्रवास

पर्यटक प्रवाशांच्या माध्यमातून मध्य रेल्वेच्या तिजोरीत २.३६ कोटी रुपयांचा महसूल जमा झाल्याचे मध्य रेल्वेकडून सांगण्यात आले.
अमन लॉज-माथेरान शटल सेवेला पर्यटकांची पसंती ;८ महिन्यांत साडेतीन लाख प्रवाशांनी केला प्रवास

मुंबई : नेरळ येथील माथेरान पर्यटनस्थळ म्हणजे पर्यटकांचे आकर्षण. माथेरानला येणाऱ्या पर्यटकांसाठी नेरळ-अमन लॉज-माथेरान मार्गादरम्यान शटल सेवा सुरू केली आहे. ही शटल सेवा पर्यटकांच्या पसंतीस उतरली असून एप्रिल ते नोव्हेंबर या आठ महिन्यांत तब्बल ३ लाख ३४ हजार ४२ प्रवाशांनी शटल सेवा अनुभवली. तर पर्यटक प्रवाशांच्या माध्यमातून मध्य रेल्वेच्या तिजोरीत २.३६ कोटी रुपयांचा महसूल जमा झाल्याचे मध्य रेल्वेकडून सांगण्यात आले.

माथेरान थंड हवेचे ठिकाण यामुळे दरवर्षी लाखो पर्यटक भेट देतात. प्रवाशांसाठी शटल सेवेसह मध्य रेल्वेने हे ठिकाण एक प्रमुख पर्यटनस्थळ म्हणून लोकप्रिय करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. माथेरानला जाण्यासाठी नेरळ स्थानकातून शटल सेवा उपलब्ध आहे. पर्यटकांना आरामदायी प्रवास देण्याबरोबरच, या स्वस्त सेवा आणि जलद साहित्याची वाहतूक करण्यासही शटल सेवा उपयुक्त ठरते. माथेरान पर्यटनस्थळी येणाऱ्या प्रवाशांना सुरक्षित आणि आरामदायी प्रवास उपलब्ध करुन देण्यासाठी मध्य रेल्वे प्राधान्याने भूमिका बजावते. मध्य रेल्वेने हे ठिकाण केवळ एक प्रमुख पर्यटनस्थळ नाही, तर निसर्गाच्या जवळ जाणारे ठिकाण म्हणूनही लोकप्रिय केले आहे. हे टॉय ट्रेनमधील अविस्मरणीय राईडसह निसर्ग जवळून पाहण्याचा थरार अनुभवता येतो. त्यामुळे माथेरानच्या नैसर्गिक वातावरणातील शांततेत मन तृप्त होते.

महिना प्रवासी महसूल

एप्रिल ४०,०२३ ३०,१६,५५०

मे ५६,९३१ ४६,४८,८६१

जून ४०,३६२ २८,७२,५७४

जुलै ३९,१७९ २७,५८,०२१

ऑगस्ट ४०,३९६ २६,५५,९३५

सप्टेंबर ३५,८१७ २३,२३,८६५

ऑक्टोबर ३४,८८७ १९,५७,९९२

नोव्हेंबर ४६,४४७ ३३,७६,६४४

एकूण ३,३४,०४२ २,३६,१०,४२

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in