मुंबई-पुणे द्रूतगती मार्गावर आज वाहतूक ब्लॉक, 'या' वेळेत वाहतूक पूर्णतः बंद

यशवंतराव चव्हाण मुंबई-पुणे द्रूतगती मार्गावर हायवे ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम अंतर्गत मुंबई वाहिनीवर साखळी क्रमांक कि.मी १५.७५० येथे गॅन्ट्री बसविण्याचे काम मंगळवार, १३ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ हाती घेणार आहे.
मुंबई-पुणे द्रूतगती मार्गावर आज वाहतूक ब्लॉक, 'या' वेळेत वाहतूक पूर्णतः बंद

मुंबई : यशवंतराव चव्हाण मुंबई-पुणे द्रूतगती मार्गावर हायवे ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम अंतर्गत मुंबई वाहिनीवर साखळी क्रमांक कि.मी १५.७५० येथे गॅन्ट्री बसविण्याचे काम मंगळवार, १३ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ हाती घेणार आहे. मंगळवारी दुपारी १२ ते २ या वेळेत हे काम करण्यात येणार आहे. त्यामुळे या काळात वाहतूक ब्लॉक घेण्यात आला आहे. या कामादरम्यान मंगळवारी द्रुतगती महामार्गावरील मुंबई वाहिनीवरील सर्व प्रकारची वाहतूक पूर्णत: बंद ठेवण्यात येणार आहे.

यावेळी वाहनधारकांना पर्यायी मार्गाने प्रवास करता येईल. द्रूतगती मार्गावरून पुणे-मुंबई वाहिनीवरील (पुण्याहून मुंबईकडे येणारी) हलकी वाहने मुंबई वाहिनीवर लेन किमी ५५.००० वरून वळवून मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्ग क्र. ४८ या जुना पुणे-मुंबई मार्गावरून मार्गस्थ होतील. द्रुतगती मार्गावरून पुणे-मुंबई वाहिनीवरील (पुण्याहून मुंबईकडे येणारी) हलकी वाहने व बसेस खोपोली एक्झिट कि.मी ३९.८०० येथून वळवून राष्ट्रीय महामार्ग क्र. ४८ या जुना पुणे-मुंबई महामार्गावरून खोपोली शहरातून पुढे शेंडूग टोलनाकामार्गे मुंबई वाहिनीवरून मार्गस्थ होतील.

logo
marathi.freepressjournal.in