मुंबईत वाहतूककोंडी गंभीर होणार ; दररोज ७०० वाहनांची खरेदी

मुंबईत आरटीओची मुंबई सेंट्रल, वडाळा, अंधेरी आणि बोरिवली येथे मिळून एकूण चार कार्यालये
मुंबईत वाहतूककोंडी गंभीर होणार ; दररोज ७०० वाहनांची खरेदी
Published on

मुंबईत दररोज एकूण ७०० वाहनांची खरेदी होत असून, यंदा तब्बल वाहन खरेदीत २५ टक्के वाढ झाली आहे. वाहन खरेदी याच वेगाने सुरू राहीली, तर आधीच वाहनांनी तुडुंब भरलेले रस्ते वाढीव वाहनांचा भार सोसू शकणार नाहीत. यामुळे वाहतूककोंडी आणि पार्किंग समस्या अत्यंत गंभीररूप धारण करेल. परिणामी भविष्यात या समस्या सोडवण्यासाठी गर्दीच्या ठिकाणी कंगेशन कर आकारून पार्किंग दंडाच्या रकमेत मोठी वाढ करावी लागेल, असा इशारा वाहतूक तज्ज्ञांनी दिला आहे.

मुंबई सेंट्रल आरटीओने प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार, २०२२-२३ आर्थिक वर्षात मुंबईतील वाहन नोंदणीत २०२१-२२च्या तुलनेत २५ टक्के वाढ झाली आहे. २०२२-२३ साली मुंबई सेंट्रल आरटीओमध्ये एकूण ६४८७६ वाहनांची नोंदणी झाली आहे. आधीच्या २०२१-२२ सालातील नोंदणीच्या तुलनेत ही संख्या १३ हजारांनी अधिक आहे. २०२१-२२ साली मुंबई सेंट्रल आरटीओत ५१५५६ वाहनांची नोंदणी झाली हेाती.

मुंबईत आरटीओची मुंबई सेंट्रल, वडाळा, अंधेरी आणि बोरिवली येथे मिळून एकूण चार कार्यालये आहेत. पैकी मुंबई सेंट्रल कार्यालयाने मंगळवारी आकडेवारी प्रसिद्ध केली. त्यानुसार, या आरटीओत २०२२-२३ साली एकूण ३४८७ इलेक्ट्रीक वाहनांची नोंदणी झाली असून, त्यात १८५३ कार आणि १२७१ दुचाकींचा समावेश आहे. २०२१-२२ साली याच आरटीओमध्ये एकूण १९७८ इलेक्ट्रीक वाहनांची नेांदणी झाली हेाती. त्यात ६८७ कार आणि १०४९ दुचाकी वाहनांचा समावेश हेाता. मुंबईत प्रति किलो मीटर २२०० वाहने आधीच आहेत. त्यात आता दररेाज सुमारे ७०० वाहनांची भर पडत आहे. यामुळे वाहतूककोंडी आणि पार्कींग समस्येबरेाबर प्रदुषणात देखील मोठी वाढ हेाणार आहे. शिवाय वाहतूककोंडीमुळे प्रवासात विलंब होणार हा भाग निराळाच आहे. 

logo
marathi.freepressjournal.in