कांदिवली पश्चिम येथील वाहतूककोंडी फुटणार;तीन नवीन पूल बांधण्याचा पालिकेचा निर्णय

महात्मा गांधी मार्ग आणि पोयसर रोड हे दोन चारकोपला जाण्यासाठी पर्यायी मार्ग आहेत.
कांदिवली पश्चिम येथील वाहतूककोंडी फुटणार;तीन नवीन पूल बांधण्याचा पालिकेचा निर्णय

कांदिवली पश्चिम येथील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी मुंबई महापालिकेच्या पूल विभागाने तीन नवीन पूल बांधण्याचा निर्णय घेतला आहे. तीन नवीन पुलांपैकी एक पूल पादचाऱ्यांसाठी असून दोन पूल वाहनधारकांसाठी आहेत. तीन नवीन पूल बांधण्यासाठी मुंबई महापालिका ५६ कोटी रुपये खर्चणार आहे.

मुंबईतील वाहतूक कोंडीची समस्या दूर करण्यासाठी नवीन पूल बांधण्यात येत आहेत. पश्चिम उपनगरातील विशेष करुन कांदिवली पश्चिम येथील वाहतूक कोंडी तीन पूल बांधण्यात येणार आहेत. महात्मा गांधी मार्ग आणि पोयसर रोड हे दोन चारकोपला जाण्यासाठी पर्यायी मार्ग आहेत. चारकोप, लिंक रोड, पोयसर रोड परिसरातील लोकवस्तीत मोठ्याप्रमाणात वाढ होत असल्याने पालिकेने या भागातील नागरी सुविधा तसेच जुन्या पादचारी पुलांची डागडुजी व नवीन उभारणीवर भर दिला आहे. याचा एक भाग म्हणून पोयसर नदीशेजारी पारेख नगर येथील जुना पादचारी पूल पाडण्यात येणार आहे. हा पूल जमीनदोस्त केल्यानंतर त्या ठिकाणी नवीन पूल बांधण्यात येणार आहे.

यापाठोपाठ आणखी तीन नवीन पूल या भागात बांधण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. कांदिवली पश्चिम येथील शंकर लेन आणि इराणी वाडी रोड क्र. ४ ला जोडणारा पूल तसेच जवाहरलाल रामसुमेर यादव मार्ग येथील पोयसर नदीच्या बी शाखेकडील जुने पूल पाडून नवीन पूल उभारण्यात येणार आहेत. इंडिया नगर, एम. जी रोड, क्र १ येथील जुना पूल देखील पाडण्यात येणार आहे. पोयसर आणि इंडिया नगर पुलांवरून नागरी तसेच गाड्यांची वाहतूक सुरू राहील, अशी रचना केली जाणार आहे. या पूल बांधणीसाठी पालिकेने निविदा मागवल्या आहेत.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in