भाजपच्या प्रशिक्षण वर्गानिमित्त वाहतूक नियोजन

मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्यामुळे वाहतूककोंडी होण्याची शक्यता वर्तविली
भाजपच्या प्रशिक्षण वर्गानिमित्त वाहतूक नियोजन

ठाणे : भिवंडीमधील अंजूर येथील सया रिसॉर्ट येथे १३ जुलै रोजी भाजप पक्षातर्फे राज्यस्तरीय प्रशिक्षण वर्ग आयोजित करण्यात आले आहे. यामुळे मानकोली पूल ते सया रिसॉर्ट रस्ता हा मार्गावर दोन्ही बाजूस सकाळी ६.०० ते रात्री २२.०० वाजेपर्यंत वाहने लावण्यास (नो पार्किंग) प्रतिबंध करण्यात आला असल्याची माहिती ठाणे शहर वाहतूक विभाग, पोलीस उपआयुक्त डॉ. विनयकुमार राठोड यांनी दिली आहे. दि. १३ जुलै रोजी अंजूर येथील सया रिसॉर्ट या ठिकाणी भाजप केंद्रातील व महाराष्ट्रातील खासदार व आमदार तसेच राज्यस्तरीय पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. या ठिकाणी जनसमुदाय जमा होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. मानकोली चौक ते साया रिसॉर्ट रस्ता अरुंद असून या मार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्यामुळे वाहतूककोंडी होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in