वाहतूक पोलिसांचे ई-चलन मशिन हिसकावून पलायन

दिडोंशी पोलिसांनी गुन्ह्यांची नोंद करून तपास सुरू केला आहे
वाहतूक पोलिसांचे ई-चलन मशिन हिसकावून पलायन
Twitter

मुंबई : शासकीय कर्तव्य बजाविताना वाहतूक पोलीस शिपायांशी हुज्जत घालून त्यांचे ई-चलन मशिन हिसकावून पलायन केल्याचा प्रकार गोरेगाव परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी दिडोंशी पोलिसांनी गुन्ह्यांची नोंद करून तपास सुरू केला आहे. गोरेगाव येथे कर्तव्य बजाविणाऱ्या वाहतूक पोलीस शिपाई कैलास हनुमंत अंभग यांच्याशी एका अज्ञात व्यक्तीने हुज्जत घालून त्यांच्या शर्टाचे नेम प्लेट तोडून टाकले. त्यानंतर त्यांच्याकडील ई-चलन मशिन हिसकावून तेथून पलायन केले. विरुद्ध दिशेने कार चालविली म्हणून दंडात्मक कारवाई करताना हा प्रकार घडल्याचे पोलिसांनी सांगितले.

याप्रकरणी दिडोंशी पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध पोलिसांशी हुज्जत घालून सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा नोंदविला आहे. कारच्या क्रमांकावरून या व्यक्तीचा पोलिसांकडून शोध सुरू आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in