कोस्टल रोडवर तिसरा डोळा; जादा वाहतूक पोलीस तैनात करण्याची BMC ची सूचना 

कोस्टल रोडवर वाहतूक पोलिसांनी अधिक सतर्क राहत बोगद्यातून बाहेर पडण्याच्या ठिकाणी अधिक पोलीस तैनात करावेत, अशी विनंती मुंबई पालिकेने केली आहे.
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र
Published on

मुंबई : कोस्टल रोडवर वाहतूक पोलिसांनी अधिक सतर्क राहत बोगद्यातून बाहेर पडण्याच्या ठिकाणी अधिक पोलीस तैनात करावेत, अशी विनंती मुंबई पालिकेने केली आहे. मार्गावर २८ ठिकाणी स्पीड डिटेक्शन कॅमेरे दोन महिन्यात कार्यान्वित होणार असल्याची पालिका अधिकाऱ्याने दिली. 

बोगद्यातून बाहेर पडणाऱ्या आणि वांद्रे-वरळी सी-लिंक दरम्यानचा रस्ता अनधिकृत रेसिंग ट्रॅक म्हणून वाहनचालक, दुचाकीस्वार वापरत असल्याच्या तक्रारी आल्या आहेत. पालिकेच्या वतीने बोगद्यातून बाहेर पडण्याच्या मार्गासह, रस्त्याच्या कडेला महत्त्वाच्या ठिकाणी कॅमेरे बसवले जाणार आहेत. हे कॅमेरे वेग मर्यादा ओलांडणाऱ्या वाहनांचे नोंदणी क्रमांक नोंदवून घेतील व चलन चालकाच्या फोनवर पाठवण्यात येणार आहे. खुल्या रस्त्यावर वेग मर्यादा ताशी ८० किमी आहे. तर बोगद्यात ताशी ६० किमी आहे. बोगद्यात वाहनांवर नजर ठेवण्यासाठी दर ५० ते १०० मीटर अंतरावर सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. मात्र वेगवान वाहनांवर कारवाईसाठी बोगद्यातील कॅमेरे यंत्रणा पूर्णपणे कार्यान्वित होत नाही. तोपर्यंत लगाम बसवता येणार नसल्याचे सांगण्यात येते.

अधिक कॅमेरे बसवणार

सध्या या मार्गावर पालिकेचे १५४ स्पीड डिक्टेशन कॅमेरे वाहनांच्या हालचालीवर नजर ठेवतात. या मार्गावर गाड्या वेगाने चालवल्या जातात, अशा अनेक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. यासाठी लवकरच अधिकचे स्पीड डिक्टेशन कॅमेरे बसवण्यात येणार आहे. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी पालिकेने वाहतूक पोलीस विभागाचे सहआयुक्त यांना या मार्गावर अतिरिक्त पोलीस तैनात करण्याची विनंती केली आहे, असे पालिकेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. 

वाढत्या वाहनांची वर्दळ

कोस्टल रोडवर वाहनांची वर्दळ सातत्याने वाढत आहे. मार्च महिन्यात दक्षिणेकडील कॅरेजवेवर दररोज सरासरी वाहनांची संख्या १३,८७४ होती. जी डिसेंबरपर्यंत २३,०९९ वाहने होती. उत्तरेकडील रस्ता - जो जूनमध्ये सुरू झाला त्यात वर्षाच्या अखेरीस दररोज १४,६०४ वाहने होती. मात्र वर्षाच्या सुरुवातीला २१,५२० वाहनांची वाढ झाली आहे.

logo
marathi.freepressjournal.in