दोन हजाराची लाच घेताना वाहतूक पोलीस उपनिरीक्षकाला अटक

फ्रॉन्सिस रॉकी रेगो असे या पोलीस उपनिरीक्षकाचे नाव असल्याचे पोलिसांनी सांगितले. यातील तक्रारदाराच्या मालकीचे दोन कार आहे.
दोन हजाराची लाच घेताना वाहतूक पोलीस उपनिरीक्षकाला अटक

मुंबई : दोन हजाराची लाच घेताना सहार वाहतूक पोलीस चौकीतील एका पोलीस उपनिरीक्षकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी अटक केली. फ्रॉन्सिस रॉकी रेगो असे या पोलीस उपनिरीक्षकाचे नाव असल्याचे पोलिसांनी सांगितले. यातील तक्रारदाराच्या मालकीचे दोन कार आहे. त्या दोन्ही कार त्यांनी ओला कंपनीमध्ये भाड्याने दिले आहेत. त्यापैकी एक कार ते स्वत चालवितात तर दुसरी कार त्यांनी त्यांच्या मित्राला दिली होती. दोन दिवसांपूर्वी त्यांचा मित्र ठाण्याहून एका प्रवाशाला घेऊन अंधेरीतील बिसलेरी जंक्शनजवळ आला होता.

यावेळी तिथे उपस्थित पोलीस उपनिरीक्षक फ्रॉन्सिस रेगो यांनी या वाहनांवर सतरा हजार रुपयांचा दंड बाकी असल्याचे तसेच कारचे फिटनेस संपल्याचे सांगून त्यांच्याकडील कार ताब्यात घेतली होती. दंडाची रक्कम टाळण्यासाठी त्याच्याकडे दोन हजार रुपयांची लाचेची मागणी केली होती. ही रक्कम दिल्याशिवाय कार ताब्यात देण्यात येणार नाही, असे सांगितले. त्यामुळे त्याने लाचेची रक्कम देण्याची तयारी दर्शवून त्याच्याविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर गुरुवारी पोलीस उपनिरीक्षक फ्रॉन्सिस रेगो यांना दोन हजार रुपयांची लाचेची रक्कम घेताना या अधिकाऱ्यांनी रंगेहाथ पकडले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in