विधानभवनाबाहेर आत्मदहनाचा प्रयत्न करणाऱ्या शेतकऱ्याचा दुर्देवी मृत्यू

विधानभवनाबाहेर आत्मदहनाचा प्रयत्न करणाऱ्या शेतकऱ्याचा दुर्देवी मृत्यू

आत्मदहनाच्या प्रयत्नात हा शेतकरी गंभीररीत्या भाजला गेला होता.

राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान विधानभवनाबाहेर अंगावर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न करणाऱ्या शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे. सुभाष भानुदास देशमुख असे या शेतकऱ्याचे नाव आहे. आत्मदहनाच्या प्रयत्नात हा शेतकरी गंभीररीत्या भाजला गेला होता. त्यानंतर त्यांना उपचारासाठी पोलिसांनी रुग्णालयात दाखल केले होते; मात्र उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला आहे.अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीमुळे सुभाष देशमुख यांनी हे टोकाचे पाऊल उचलले होते. देशमुख हे साताऱ्याच्या कांदळगावचे रहिवासी होते. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी देशमुख यांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला होता. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये घमासान सुरू असताना विधिमंडळाबाहेर हा प्रकार घडला होता.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in