मुंबई महापालिकेत बदली घोटाळ्याचे सत्र कायम; ५५ अधिकाऱ्यांची पूर्वीच्या यादीतीलच पदस्थापना

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पालिकेतील बदली घोटाळ्यात हस्तक्षेप करून तो थांबवून सात महिन्यांहून अधिक कालावधी लोटल्यानंतर आता पुन्हा एकदा महापालिकेत नियमित बदल्यांच्या नावाखाली तोच बदली घोटाळा समोर आला आहे.
मुंबई महापालिकेत बदली घोटाळ्याचे सत्र कायम; ५५ अधिकाऱ्यांची पूर्वीच्या यादीतीलच पदस्थापना
मुंबई महापालिकेत बदली घोटाळ्याचे सत्र कायम; ५५ अधिकाऱ्यांची पूर्वीच्या यादीतीलच पदस्थापना(Photo- Kishori Ghaywat)
Published on

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पालिकेतील बदली घोटाळ्यात हस्तक्षेप करून तो थांबवून सात महिन्यांहून अधिक कालावधी लोटल्यानंतर आता पुन्हा एकदा महापालिकेत नियमित बदल्यांच्या नावाखाली तोच बदली घोटाळा समोर आला आहे. नव्या यादीत ५५ अधिकाऱ्यांना पूर्वीच्या यादीतीलच पदस्थापना दिली जात असल्याचा दावा भाजप आमदार मिहिर कोटेचा यांनी केला आहे.

हा बदली घोटाळा पालिका आयुक्त अश्विनी भिडे यांच्या निदर्शनाला आणून देताना भाजप आमदार मिहिर कोटेचा यांनी घोटाळा पुन्हा होण्यापासून रोखण्यासाठी आयुक्तांनी हस्तक्षेप करण्याची मागणी केली. अतिरिक्त महापालिका आयुक्त आणि महापालिका आयुक्त यांच्या स्वाक्षऱ्या अद्याप या आदेशांवर झालेल्या नसल्याचेही त्यांनी नमूद केले.

मुंबई महापालिकेत बदली घोटाळ्याचे सत्र कायम; ५५ अधिकाऱ्यांची पूर्वीच्या यादीतीलच पदस्थापना
Mumbai : ‘वर्षा’वर धडकण्यापूर्वीच आंदोलनकर्त्यांची धरपकड; कोकणातील आंबा-काजू उत्पादक शेतकऱ्यांसाठी आघाडीचे आंदोलन

ऑक्टोबरमध्ये अमित सैनी अतिरिक्त महापालिका आयुक्त असताना उपअभियंते आणि सहाय्यक अभियंत्यांसह १६१ अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश काढण्यात आले होते. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्काळ त्या सर्व बदल्या रद्द केल्या होत्या. या ‘कॅश फॉर पोस्टिंग’ घोटाळ्यात पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून विविध श्रेणीतील बदल्या आणि पदोन्नतीसाठी ५ लाख ते ४० लाख रुपये घेतल्याचे गंभीर आरोप झाले होते.

logo
marathi.freepressjournal.in