जेजे.तील बदली कामगारांची संपातून माघार
PM

जेजे.तील बदली कामगारांची संपातून माघार

रुग्णांची गैरसोय होऊ नये यासाठी नियमित कर्तव्यावर हजार राहणार असल्याचे न्यायालयीन बदली कर्मचाऱ्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि जे.जे. समूहाला पत्राद्वारे स्पष्ट केले आहे.

मुंबई : जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी गुरुवार १४ डिसेंबरपासून बेमुदत संप सुरू करण्यात आला असून या संपात जे.जे. रुग्णालयातील बदली कामगार सहभागी होणार नाहीत. रुग्णांची गैरसोय होऊ नये यासाठी नियमित कर्तव्यावर हजार राहणार असल्याचे न्यायालयीन बदली कर्मचाऱ्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि जे.जे. समूहाला पत्राद्वारे स्पष्ट केले आहे.

सरकारी, निमसरकारी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांसाठी जुनी पेन्शन योजना लागू करणे व इतर मागण्यांच्या संदर्भात राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना यांनी सरकारी कर्मचारी व शिक्षकांच्या मागण्यासाठी गुरुवारपासून बेमुदत संप आंदोलन पुकारणार असल्याचे संचालक, वैद्यकीय शिक्षण व संशोधन, मुंबई यांच्या संदर्भीय पत्रान्वये कळविण्यात आले आहे. मात्र अॅडव्होकेट उपाध्याय व अॅडव्होकेट जे. पी. कामा, कायदेतज्ज्ञ यांच्या मार्गदर्शनाने न्यायालयीन बदली कर्मचारी (सर जे.जी. रुग्णालये आस्थापना, ग्रॅन्ट शासकिय वैद्यकिय महाविद्यालय आस्थापना व पारिराचारीका नर्सिंग आस्थापना) हे या संपात सहभागी होणार नाहीत. आम्ही सर्व नियमितपणे कर्तव्यावर हजर राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

logo
marathi.freepressjournal.in