शपथविधी सोहळ्यासाठी मुंबईतील वाहतुकीत बदल; पंतप्रधानांसह ६० हून अधिक व्हीव्हीआयपी आझाद मैदान परिसर नो पार्किंग झोन

विधानसभा निवडणुकीत महायुतीला एक हाती सत्ता स्थापन करण्याचा बहुमान दिला आहे. महायुतीचा महाशपथविधी सोहळा उद्या गुरुवारी आझाद मैदानात पार पडणार आहे. शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांसह देशभरातील बडे नेते कलाकार, उद्योगपती असे ६० हून अधिक व्हीव्हीआयपी सहभागी होणार आहेत.
शपथविधी सोहळ्यासाठी मुंबईतील वाहतुकीत बदल; पंतप्रधानांसह ६० हून अधिक व्हीव्हीआयपी आझाद मैदान परिसर नो पार्किंग झोन
Published on

मुंबई : विधानसभा निवडणुकीत महायुतीला एक हाती सत्ता स्थापन करण्याचा बहुमान दिला आहे. महायुतीचा महाशपथविधी सोहळा उद्या गुरुवारी आझाद मैदानात पार पडणार आहे. शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांसह देशभरातील बडे नेते कलाकार, उद्योगपती असे ६० हून अधिक व्हीव्हीआयपी सहभागी होणार आहेत. सीएसएमटी जवळील आझाद मैदानावर होणाऱ्या शपथविधी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी दुपारी १२ वाजल्यापासून मुंबईतील वाहतुकीत मोठ्या प्रमाणावर बदल करण्यात आला आहे. दरम्यान, आझाद मैदान परिसर नो पार्किंग झोन म्हणून जाहीर केला आहे.

महायुतीच्या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा, राजनाथ सिंह, निर्मला सितारमण, विविध राज्यातील मुख्यमंत्री, कलाकार, बडे उद्योगपती उपस्थित असणार आहेत. त्यामुळे आझाद मैदान परिसरात पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तसेच व्हीव्हीआयपी मुव्हमेंट वेळी कुठलीही गैरसोय होऊ नये यासाठी मुंबईतील वाहतुकीत बदल करण्यात आला आहे.

सीएसएमटी, चर्चगेट स्थानकाजवळील भुयारी मार्ग बंद

महायुतीचा महा शपथविधी सोहळा उद्या गुरुवारी आझाद मैदानावर पार पडणार आहे. शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह व्हीव्हीआयपी, व्हीआयपींची उपस्थिती असणार आहे. या पार्श्वभूमीवर आझाद मैदान परिसरातील दुकाने, सीएस एमटी स्थानकाजवळील सब वे, चर्चगेट स्थानकाजवळील सब वे तील दुकाने पूर्णतः बंद करण्यात आली आहे.

या बेस्ट बस मार्गांत बदल

महापालिका मार्ग - वासुदेव बळवंत फडके चौक धोबी तलाव ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (गरज असेल तेव्हा पूर्णपणे बंद करणार) बस क्रमांक १४, २८, ६६, ६९, ए १२६. या मार्गावरील बस त्या कालावधीत दोन्ही दिशेला धोबी तलाव महात्मा फुले मंडई मार्गे वळवण्यात येतील.

लोकमान्य टिळक मार्ग - चाफेकर बंधू चौक ते ते वासुदेव बळवंत फडके चौक धोबी तलाव यादरम्यानचा हा फॅशन स्ट्रीट मार्ग पूर्णपणे बंद ठेवण्यात येईल त्यामुळे तेथून जाणाऱ्या ए ५ . १५ . ८३ . सी ८६ . ८८ या बस या दरम्यान धोबी तलाव , महात्मा फुले मंडई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस खादी भांडार मार्गे हुतात्म्या चौकात जातील.

या मार्गांचा वापर करा

महानगरपालिका मार्ग:- छत्रपती शिवाजी महाराज जंक्शन (सी. एस एम. टी. जंक्शन ) ते वासुदेव बळवंत फडके चौक (मेट्रो जंक्शन) पर्यंत दोन्ही वाहिन्या बंद ठेवण्यात येतील. तेथून प्रवास करणाऱ्या वाहन चालकांनी एल. टी. मार्ग चकाला जंक्शन उजवे वळण-डि. एन रोड छत्रपती शिवाजी महाराज - जंक्शन (सी. एस एम. टी. जंक्शन) या पर्यायी मार्गाचा वापर करावा.

तसेच विरुद्ध दिशेने जणाऱ्या वाहन चालकांनी महात्मा गांधी मार्गही आवश्यतेनुसार बंद ठेवण्यात येणार आहे. वाहन चालकांनी एल. टी. मार्ग चकाला जंक्शन उजवे वळण-डि. एन रोड सी.एस. एम. टी. इच्छित स्थळी मार्गस्थ व्हावे, असे आवाहन वाहतूक पोलिसांकडून करण्यात आले आहे.

याशिवाय हजारीमल सोमानी मार्गावरील वाहतूक चाफेकर बंधू चौक (ओ. सी. एस. जंक्शन) ते छत्रपती शिवाजी महाराज जंक्शन (सी. एस एम. टी. जंक्शन) पर्यंत वाहतूक प्रतिबंधित असेल. पर्यायी व्यवस्था म्हणून चाफेकर बंधू चौक (ओ. सी. एस. जंक्शन) हुतात्मा चौक-काळा घोडा के दुभाष मार्ग - शहिद भगतसिंग मार्गाचा वापर करावा. तसचे प्रिसेंस स्ट्रिट ब्रिज (मेघदुत ब्रिज) (दक्षिण वाहिनी) (एन. एस. रोड तसेच कोस्टल रोडने श्यामलदास गांधी जंक्शनकडे जाणारी वाहतूक आवश्यकतेनुसार बंद ठेवण्यात येईल. ती वाहतूक एन. एस. रोड मार्गे वळविण्यात येणार आहे. तसचे रामभाऊ साळगांवकर रोड (एक दिशा मार्ग) रामभाऊ साळगांवकर रोडवरील इंदु क्लिनिक जंक्शन (सय्यद जमादार चौक ते व्होल्गा चौक सर्व प्रकारच्या वाहनांसाठी दुहेरी मार्गिका दुपारी १२ वा. ते २०.०० वा पर्यंत खुली करण्यात येत आहे.

शपथविधीच्या अनुषंगाने आझाद मैदान परिसरात मोठ्याप्रमाणात कार्यकर्ते व अति महत्त्वाचे व्यक्ती येणार असल्यामुळे सामान्य नागरिकांनी आझाद मैदान व छत्रपती शिवाजी टर्मिनस (सी एस एम टी) येथून प्रवास करताना योग्य नियोजन करावे, तसेच पर्यायी मार्गांचा वापर करावा. वाहतूक बदलाबाबतचे आदेश पोलीस वाहतूक विभागाच्या उपायुक्त(दक्षिण) प्रज्ञा जेडगे यांनी जारी केले आहे.

logo
marathi.freepressjournal.in