नाशिकहून मुंबईचा प्रवास ३ ऐवजी ६ तास - बाळासाहेब थोरात

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर बेशिस्त वाहतूक पहायला मिळते, लेनची शिस्त पाळली जात नाही.
नाशिकहून मुंबईचा प्रवास ३ ऐवजी ६ तास - बाळासाहेब थोरात
Published on

महामार्गावर होत असलेल्या अपघातांचे प्रकार गंभीर असून हायवेवर वाहन चालवताना शिस्त दिसत नाही तर काही महामार्गांची अवस्था अत्यंत खराब आहे. नाशिकहून मुंबईचा प्रवास हा फक्त ३ तासांचा आहे; परंतु खराब महामार्गामुळे त्यास ६ तास लागतात. यातून अपघाताचे प्रसंग उद्धवतात, हे लक्षात घेता राज्य सरकारचे महामार्गाच्या संदर्भात काही ठोस धोरण आहे का? किंवा त्यासंदर्भात काही निर्णय घेणार आहे का, असा प्रश्न काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात यांनी विचारला आहे.

आमदार विनायक मेटे यांच्या अपघाती मृत्यूवरील चर्चेत भाग घेत थोरात यांनी खराब महामार्ग व त्यावरून करावा लागणारा जीवघेणा प्रवास, याबद्दल प्रश्न उपस्थित केला. मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर बेशिस्त वाहतूक पहायला मिळते, लेनची शिस्त पाळली जात नाही. आपण सुरक्षित वाहन चालवत असलो तरी समोरचा त्याच पद्धतीने शिस्तबद्ध वाहन चालवत असेलच, असे नाही.

logo
marathi.freepressjournal.in