Mumbai : आंदोलनकर्त्या आदिवासी विद्यार्थ्यांना अटक

आपल्या विविध मागण्यांसाठी नाशिकपासून मुंबईत लाँगमार्च करत दाखल झालेल्या आदिवासी विद्यार्थ्यांवर पोलिसांनी ऐन मध्यरात्री अटकेची कारवाई केल्याने काँग्रेसने सोमवारी संताप व्यक्त केला.
Mumbai : आंदोलनकर्त्या आदिवासी विद्यार्थ्यांना अटक
Published on: 

मुंबई : आपल्या विविध मागण्यांसाठी नाशिकपासून मुंबईत लाँगमार्च करत दाखल झालेल्या आदिवासी विद्यार्थ्यांवर पोलिसांनी ऐन मध्यरात्री अटकेची कारवाई केल्याने काँग्रेसने सोमवारी संताप व्यक्त केला. पोलिसांनी विद्यार्थ्यांना मारहाण करत अटक केल्याने आक्रमक होत काँग्रेसने विद्यार्थ्यांची सुटका करण्याची तसेच या बेकायदेशीर कारवाईच्या विरोधात पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

नाशिकहून आलेले आदिवासी विद्यार्थी रविवारी रात्री दादर येथील काँग्रेसच्या टिळक भवनमध्ये विसावले होते. आपल्या न्यायमागण्यासाठीआदिवासी विद्यार्थी आझाद मैदानात जाणार होते. पण पोलिसांनी या विद्यार्थ्यांच्या बसेस मध्यरात्री तीन वाजता रस्त्यात अडवल्या आणि विद्यार्थ्यांचे फोटो काढले. तुमच्यावर गुन्हे दाखल करू, अशी धमकी पोलिसांनी दिली.

आंदोलन सुरू होण्याच्या अगोदरच आंदोलनाला चिरडण्याचा प्रयत्न होत असेल तर सरकार नेमके कशाला घाबरत आहे, असा सवाल काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.

logo
marathi.freepressjournal.in