विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात माजी दिवंगत सदस्यांना श्रद्धांजली

डॉ. माणिकराव पद्मण्णा मंगुडकर आणि प्रभाकर दामोदर दलाल यांच्या निधनाबाबत शोकप्रस्ताव मांडला
विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात माजी दिवंगत सदस्यांना श्रद्धांजली

मुंबई : विधिमंडळाच्या सोमवारपासून सुरू झालेल्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी दोन्ही सभागृहांमध्ये माजी दिवंगत सदस्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. विधान परिषदेत उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिवंगत माजी विधान परिषद सदस्य डॉ. माणिकराव पद्मण्णा मंगुडकर आणि प्रभाकर दामोदर दलाल यांच्या निधनाबाबत शोकप्रस्ताव मांडला.

विधानसभेत विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी दिवंगत सदस्यांविषयीचा शोकप्रस्ताव माजी मंत्री, विद्यमान लोकसभेचे सदस्य व माजी विधानसभा सदस्य गिरीश बापट, विद्यमान लोकसभेचे सदस्य व माजी विधानसभा सदस्य सुरेश उर्फ बाळू धानोरकर, माजी विधानसभा सदस्य सर्वश्री शंकरराव वाकुळणीकर (कोळकर), बाबुराव वाघमारे, रामचंद्र अवसरे या दिवंगत सदस्यांच्या निधनाबद्दल विधानसभेत श्रद्धांजली वाहण्यात आली.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in