रॉबरीसह घरफोडीच्या गुन्ह्यांतील त्रिकुटास अटक

यातील धीरजविरुद्ध कुरार पोलीस ठाण्यात रॉबरीसह घरफोडीचे सहा गुन्हे, चेतनविरुद्ध एक तर सुरेशविरुद्ध तीन गुन्ह्यांची नोंद असल्याचे उघडकीस आले.
रॉबरीसह घरफोडीच्या गुन्ह्यांतील त्रिकुटास अटक

मुंबई : रॉबरीसह घरफोडीच्या गुन्ह्यांतील एका त्रिकुटाला कुरार पोलिसांनी घरफोडीच्या साहित्यासह अटक केली. धीरज रामनारायण गुप्ता ऊर्फ लाला, चेतन संजय राणे आणि सुरेश लालजी दुबे ऊर्फ गोली अशी या तिघांची नावे आहेत. मालाड येथे घरफोडीच्या उद्देशाने आल्यानंतर त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली आहे. अटकेनंतर या तिघांनाही बोरिवलीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली होती. शुक्रवारी मुंबई पोलिसांनी ऑल आऊट ऑपरेशन हाती घेतले होते. ही मोहीम सुरू असताना मालाडच्या कुरारगाव, वाघेश्‍वरी मंदिराजवळील पालनगर परिसरात चार तरुण संशयास्पदरीत्या फिरत असताना पोलिसांच्या निदर्शनास आले होते. हा प्रकार संशयास्पद वाटताच पोलिसांनी चारही तरुणांना थांबण्याचा इशारा केला, मात्र पोलिसांना पाहताच ते सर्वजण पळू लागले. यावेळी पळून जाणाऱ्या धीरज गुप्ता, चेतन राणे आणि सुरेश दुबे या तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले तर त्यांचा एक सहकारी अंधाराचा फायदा घेऊन पळून गेला. चौकशीत ते तिघेही कांदिवलीतील रहिवाशी असून, रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. यातील धीरजविरुद्ध कुरार पोलीस ठाण्यात रॉबरीसह घरफोडीचे सहा गुन्हे, चेतनविरुद्ध एक तर सुरेशविरुद्ध तीन गुन्ह्यांची नोंद असल्याचे उघडकीस आले.

logo
marathi.freepressjournal.in