घातक शस्त्रांच्या विक्रीसाठी आलेल्या त्रिकुटास अटक

दहिसर परिसरात राहणारे काही तरुण घातक शस्त्रांची विक्रीसाठी येणार असल्याची माहिती युनिट-१२च्या अधिकाऱ्यांना मिळाली होती
घातक शस्त्रांच्या विक्रीसाठी आलेल्या त्रिकुटास अटक

मुंबई : घातक शस्त्रांची विक्रीसाठी आलेल्या एका त्रिकुटाला गुन्हे शाखेच्या दहिसर युनिटच्या अधिकाऱ्यांनी अटक केली. सुफियान इस्माईल शेख, वेदांत ऊर्फ अण्णा तिम्मया ठाणेकर आणि दिनानाथ रामलक्ष्मण यादव अशी या तिघांची नावे असून त्यांच्याकडून पोलिसांनी एक गावठी कट्टा आणि तीन जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. अटकेनंतर या तिघांनाही किल्ला कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. दहिसर परिसरात राहणारे काही तरुण घातक शस्त्रांची विक्रीसाठी येणार असल्याची माहिती युनिट-१२च्या अधिकाऱ्यांना मिळाली होती. या माहितीनंतर या पथकाने दहिसर येथील शितलादेवी मंदिराजवळ साध्या वेशात पाळत ठेवली होती. शनिवारी सुफियान शेख आणि वेदांत ठाणेकर या दोघांची हालचाल संशयास्पद वाटताच त्यांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. त्यांच्या अंगझडतीत पोलिसांना एक गावठी कट्टा आणि तीन राऊंड सापडले. त्यांना गावठी कट्टा दिनानाथ यादव याने दिल्याचे उघडकीस आले. त्यानंतर त्याला त्याच्या राहत्या घरातून पोलिसांनी अटक केली.

याच गुन्ह्यांत ते तिघेही सध्या पोलीस कोठडीत असून त्यांची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे. त्यांनी गावठी कट्टा कोठून आणला, या कट्ट्याचा कुठल्या गुन्ह्यांत वापर झाला किंवा वापर होणार होता का, त्यांनी यापूर्वीही घातक शस्त्रांची विक्री केली आहे का याचा आता पोलीस तपास करत आहेत.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in