खंडणीसाठी जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या त्रिकुटास अटक

शूटिंगसाठी त्यांच्या युनियनच्या ज्युनिअर आर्टिस्ट यांना कामावर ठेव, नाहीतर तुझ्या आर्टिस्टला काम देण्यासाठी त्यांच्याकडे खंडणीची मागणी केली होती.
बेकायदा भारतीय पासपोर्टसह बांगलादेशी नागरिकाला मुंबई विमानतळावर अटक
बेकायदा भारतीय पासपोर्टसह बांगलादेशी नागरिकाला मुंबई विमानतळावर अटक

मुंबई : खंडणीसाठी जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी ज्युनिअर आर्टिस्ट युनियनच्या तीन पदाधिकाऱ्यांना एमआयडीसी पोलिसांनी अटक केली. सरफुद्दीन मैनुद्दीन शेख, वसीम अख्तर बेग आणि सोहेल अकबर शेख अशी या तिघांची नावे आहेत. खंडणीच्या याच गुन्ह्यांत या तिघांनाही लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. जॉन कास्ट ही चित्रपटसृष्टीशी संबंधित एक कंपनी ज्युनिअर आर्टिस्ट कास्ट करून त्यांना चित्रपट क्षेत्रात काम करण्याची संधी उपलब्ध करुन देते. रविवारी ३ डिसेंबरला दिगंबर हे ४० ज्युनिअर आर्टिस्टसोबत अंधेरीत शूटिंसाठी आले असताना या तिघांनी त्यांच्याशी कामावरून वाद घालण्याचा प्रयत्न केला. शूटिंगसाठी त्यांच्या युनियनच्या ज्युनिअर आर्टिस्ट यांना कामावर ठेव, नाहीतर तुझ्या आर्टिस्टला काम देण्यासाठी त्यांच्याकडे खंडणीची मागणी केली होती. यावेळी त्यांनी त्यांना खंडणी देण्यास नकार दिला होता. त्यामुळे त्यांनी त्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती.

logo
marathi.freepressjournal.in