‘कंत्राटी डॉक्टरांच्या हाती क्षयरोग रुग्णालय’

पालिकेच्या शिवडी येथील क्षयरोग रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी, अतिदक्षता तज्ज्ञ अशी ८ पदे भरण्याचा निर्णय पालिकेच्या आरोग्य विभागाने घेतला आहे.
‘कंत्राटी डॉक्टरांच्या हाती क्षयरोग रुग्णालय’
Published on

मुंबई : मुंबई महापालिकेच्या विविध विभागात कंत्राटी पद्धतीचा अवलंब करण्यात येत आहे. आता आपत्कालीन सेवेत मोडणाऱ्या रुग्णालयातही कंत्राटी पद्धतीचा शिरकाव होणार आहे.

पालिकेच्या शिवडी येथील क्षयरोग रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी, अतिदक्षता तज्ज्ञ अशी ८ पदे भरण्याचा निर्णय पालिकेच्या आरोग्य विभागाने घेतला आहे. मात्र ही भरती कायमस्वरूपी नसून कंत्राटी पद्धतीने होणार आहे. त्यामुळे पालिकेच्या रुग्णालयाची जबाबदारी आता कंत्राटी डॉक्टरांच्या हाती असणार आहे. भविष्यात काही घटना घडल्यास त्याची जबाबदारी कोणाची असणार, असा सवाल विरोधकांनी उपस्थित केला आहे. 

नायर, सायन, केईएम, कूपर ही मुंबई महापालिकेची प्रमुख रुग्णालये आहे.

logo
marathi.freepressjournal.in