Tunisha Sharma Suicide : तुनिषाची हत्याच! ; तुनिषाच्या मामाने केले अनेक धक्कादायक खुलासे

अभिनेत्री तुनिषा शर्मा आत्महत्या प्रकरणात (Tunisha Suicide) आता अनेक खुलासे होत असून तिच्या मामाने पोलिसांकडे हत्येच्या दृष्टिकोनाने तपास करावा अशी मागणी केली.
Tunisha Sharma Suicide : तुनिषाची हत्याच! ; तुनिषाच्या मामाने केले अनेक धक्कादायक खुलासे

अभिनेत्री तुनिषा शर्माने आत्महत्या (Tunisha Sharma Suicide) केल्यानंतर तिचा सहकलाकार आणि पूर्वाश्रमीचा प्रियकर शिझान खानला अटक करण्यात आली. मुंबई पोलीस त्याची कसून चौकशी करत आहेत. पण, तुनिषाचा मामा पवन शर्माने 'तिची आत्महत्या नाही, तर हत्याच झाली' असे म्हणत पोलिसांकडे, 'हत्येच्या दृष्टीने तपास करावा' अशी मागणी केली आहे. तसेच, त्यांनी आधी हे लव्ह जिहादचे प्रकरणही असू शकते, अशीदेखील शक्यता वर्तविली होती. त्यामुळे आता या प्रकरणाबाबत आणखी काय माहिती येते? याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी केलेल्या तपासामध्ये शिझानने तुनिषा आणि तिच्या आईबरोबर व्हॉट्सअपवर केलेले संभाषण डिलिट करून टाकले. तसेच, त्याच्या फोनमधून त्याने दुसऱ्या प्रियासीबरोबर केलेले चॅटही मिळाले. आत्महत्येस प्रवृत्त करण्यासंदर्भात किंवा हत्येसंदर्भात काही संभाषण होते का? अशी शंका व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे आता पोलिसांनी याबाबाबत माहिती गोळा करण्यास सुरुवात केली असून तुनिषाच्या कुटुंबियांचा जबाबदेखील नोंदवण्यात येत आहे.

अशामध्ये तिचा मामा पवन शर्माच्या म्हणण्यानुसार, "तुनिषा कधी आत्महत्या करूच शकत नाही. मृत्यू आधी तिने एक सकारात्मक पोस्ट केली होती. यामध्ये तिने करिअर, पॅशनसारख्या गोष्टींवर लिहिले होते. मग ती आत्महत्या कशी करू शकते? तिची हत्याच केली आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास हत्याच्या दृष्टिकोनातून करावा." अशी मागणी त्यांनी केली. पुढे म्हणाले की, "शीझानला भेटल्यानंतर तुनिषाच्या वागण्याबोलण्यात खूप फरक दिसत होता. तिच्या राहणीमानामध्येही बदल दिसत होते. एवढंच नव्हे तर तिने हिजाब घालायला सुरुवात केली होती." असा खळबळजनक दावा केला.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in