Tunisha Sharma suicide : शिझान खानचा पोलिस कोठडीतील मुक्काम आणखी वाढला; न्यायालयाकडून दिलासा नाहीच

अभिनेत्री तुनिषा शर्मा (Tunisha Sharma) आत्महत्या प्रकरणात तिचा सहकलाकार शिझान खानला पोलिसांनी अटक केली होती
Tunisha Sharma suicide : शिझान खानचा पोलिस कोठडीतील मुक्काम आणखी वाढला; न्यायालयाकडून दिलासा नाहीच

टीव्ही अभिनेत्री तुनिषा शर्मा (Tunisha Sharma) आत्महत्या प्रकरणामध्ये आता अटक केलेल्या अभिनेता शिझान खानच्या अडचणीत वाढ झाली आहे. त्याच्या पोलीस कोठडीमधील मुक्काम आणखी वाढला आहे. आधी न्यायालयाने त्याला २८ डिसेंबरपर्यंतची कोठडी सुनावली होती. त्यानंतर आज यामध्ये वाढ करून ३० डिसेंबरपर्यंत त्याचा मुक्काम वाढला आहे. यावेळी पोलिसांनी न्यायालयाला सांगितले की, काही महत्त्वाचे पुरावे सापडले असल्याने आणखी मुदत मिळावी. त्यामुळे आता न्यायालयाने त्याच्या पोलीस कोठडीमध्ये वाढ केली आहे.

अवघ्या २० वर्षीय अभिनेत्री तुनिषा शर्माने आत्महत्या केली आणि अनेकांना याचा धक्का बसला. तिचा सहकलाकार आणि कथित प्रियकर शिझान खान याच्यासोबत १५ दिवसांपूर्वीच ब्रेकअप झाले होते. यानंतर आलेल्या नैराश्यातून तिने हे पाऊल उचलले असून याला शिझान कारणीभूत असल्याची टीका करण्यात आली. या प्रकरणाबद्दल आता नवे खुलासे झाले आहेत. शिझानने पोलिसांना दोन महत्त्वाची कारणे सांगितले. यामध्ये, त्याने श्रद्धा वालकर हत्या प्रकरणाचाही उल्लेख केला होता. तसेच, वयाचे अंतर सांगत त्याने ब्रेकअप केल्याचेदेखील पोलिसांना सांगितले होते.

logo
marathi.freepressjournal.in