निसर्गरम्य वातावरणात परवडणारी घरे; वांगणी येथे पंतप्रधान आवास योजनेंतर्गत साडेबारा हजार घरे

सर्वसामान्यांच्या आवाक्यातील ३०८ चौरस फुटांच्या घरांची निर्मिती वांगणी येथे करण्यात येत आहे. चढ्ढा डेव्हलपर्सच्या बांधण्यात येणाऱ्या ५०० घरांची लॉटरी एप्रिल महिन्यात काढण्यात येणार आहे. विशेष म्हणजे या घरांचे वितरण लॉटरीच्या माध्यमातून म्हाडा करणार आहे.
निसर्गरम्य वातावरणात परवडणारी घरे; वांगणी येथे पंतप्रधान आवास योजनेंतर्गत साडेबारा हजार घरे

मुंबई : सर्वसामान्यांच्या आवाक्यातील ३०८ चौरस फुटांच्या घरांची निर्मिती वांगणी येथे करण्यात येत आहे. चढ्ढा डेव्हलपर्सच्या बांधण्यात येणाऱ्या ५०० घरांची लॉटरी एप्रिल महिन्यात काढण्यात येणार आहे. विशेष म्हणजे या घरांचे वितरण लॉटरीच्या माध्यमातून म्हाडा करणार आहे. तसेच चढ्ढा डेव्हलपर्सच्या माध्यमातून एकूण २५ घरे बांधण्यात येणार असून यापैकी १२ हजार ५०० घरे पंतप्रधान आवास योजनेंतर्गत राखीव ठेवण्यात आली आहेत.

कर्जत स्थानकाच्या आधी वांगणी स्थानकापासून ३ किलोमीटर अंतरावर चढ्ढा डेव्हलपर्सच्या माध्यमातून १५५ एकर जागेवर १३३ टाॅवर तळ अधिक सात मजली बांधण्याचे काम प्रगतिपथावर सुरू आहे. १५५ एकर जमिनीवर घरांसह शाळा, अद्ययावत रुग्णालय, माॅल, खेळाचे मैदान, स्विमिंग पूल, मंदिर अशा प्रकारचे संकुल बांधण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यातील अत्यल्प उत्पन्न गटाच्या २ हजार घरांची सोडत जाहीर करण्यात आली असून, उर्वरित घरांचे काम टप्प्याटप्प्याने सुरू आहे. सध्या ४ हजार घरांचे काम वेगाने सुरू असून, २२०० घरांची सोडत काढण्यात येणार असून, पीएमओ योजनेंतर्गत ५०० घरांची सोडत एप्रिल महिन्यात काढण्यात येणार आहे.

वांगणी निसर्गसंपन्न वातावरणात उत्तम सोयींनी उपलब्ध घरांची निर्मिती करणे हे प्राधान्यक्रम दिल्याचे चढ्ढा डेव्हलपर्सचे संचालक डिम्पल चढ्ढा यांनी स्पष्ट केले. अत्यंत कमी शुल्कात, कोणतेही छुपे शुल्क न आकारता घरांची निर्मिती करण्यात येत आहे. सर्वसामान्यांना आपले हक्काचे घर साकारणे शक्य होणार आहे. या घरांची किंमत १६ ते १८ लाख रुपयांच्या आसपास असल्याचे चढ्ढा यांनी स्पष्ट केले.

अनामत रक्कम भरणे गरजेचे

या संगणकीय प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी ऑनलाईन सादर करावयाच्या अर्जासोबत अर्जदाराने प्रत्येकी ५,५९० रुपये अनामत रक्कम भरणे गरजेचे आहे. ऑनलाईन अर्ज नोंदणीसाठी २० जानेवारी, २०२४ रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत, ऑनलाईन पेमेंट स्वीकृतीसाठी २१ जानेवारी, २०२४ रोजी रात्री. ११.५९ वाजेपर्यंत, ऑनलाईन बँकेत आरटीजीएस/एनईएफटीद्वारे अनामत रकमेचा भरणा करण्यासाठी २२ जानेवारी, २०२४ रोजी रात्री ११. ५९ वाजेपर्यंत मुदत देण्यात आली आहे. २६ जानेवारी २०२४ रोजी सकाळी १०.०० वाजता सदनिका विक्रीची सोडत करण्यात येईल. अर्ज करण्याची प्रक्रिया ऑनलाईन असल्यामुळे कागदपत्र सादर करण्यासाठी मुदतवाढ मिळणार नाही. त्यामुळे पात्रतेसाठी पॅन कार्ड, आधार कार्ड, बँक पासबुक यांच्या छायांकित प्रती आणि फोटो सादर करणे गरजेचे आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in