अडीच कोटीच्या अपहारप्रकरणी दोन आरोपींना अटक

एटीएम मशिनमधून या पैशांची चोरी केली
अडीच कोटीच्या अपहारप्रकरणी दोन आरोपींना अटक

मुंबई : अडीच कोटी रुपयांच्या अपहारप्रकरणी दोन आरोपींना वनराई पोलिसांनी अटक केली. त्यात आरिफ रत्ती खानसह त्याच्या एका सहकाऱ्यांचा समावेश आहे. दोन्ही आरोपी सध्या पोलीस कोठडीत असून त्यांच्या इतर सहकाऱ्यांचा पोलिसांकडून शोध सुरू आहे. या टोळीने आतापर्यंत २८ राज्यातील एटीएम मशिनमधून अडीच कोटीचा अपहार केल्याचे प्राथमिक तपासात उघडकीस आले. देशभरातील २०० हून अधिक व्हाईट लेबल मशिनमधून ८७२ विविध बँकांची डेबिट कार्ड वापरून २७४३ व्यवहारामध्ये एटीएम मशिनमधून २ कोटी ५३ लाख १३ हजार १०० रुपये काढण्यात आले होते. त्याची कुठेही नोंद मिळून आली नाही. जवळपास २८ राज्यातील विविध एटीएम मशिनमध्ये हा संपूर्ण घोटाळा झाला होता. अज्ञात व्यक्तीने कंपनीच्या मशिनमध्ये विजेचा पुरवठा तात्पुरता बंद करुन एटीएम मशिनमधून या पैशांची चोरी केली होती. त्यामुळे तक्राराराच्या अर्जावरुन वनराई पोलिसांनी संबंधित आरोपीविरुद्ध फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा नोंदविला आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in