वाहनचोरीसह घरफोडीच्या गुन्ह्यांतील दोन आरोपींना अटक

या दोघांविरुद्ध अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद असून, त्यांच्या अटकेने चार गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे.
वाहनचोरीसह घरफोडीच्या गुन्ह्यांतील दोन आरोपींना अटक

मुंबई : वाहनचोरीसह घरफोडीच्या गुन्ह्यांतील दोन आरोपींना गुन्हे शाखेच्या दहिसर युनिटच्या अधिकाऱ्यांनी अटक केली. विवेक सुरेश केवट ऊर्फ बुढ्ढा आणि अजय अमरेश दुबे ऊर्फ पंडित अशी या दोघांची नावे असून अटकेनंतर या दोघांनाही पुढील चौकशीसाठी कस्तुरबा मार्ग पोलिसांकडे सोपविण्यात आले आहे. या दोघांविरुद्ध अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद असून, त्यांच्या अटकेने चार गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे. गेल्या काही दिवसांत बोरिवली परिसरात वाहनचोरीच्या गुन्ह्यांत लक्षणीय वाढ झाली होती. या आरोपींच्या अटकेसाठी स्थानिक पोलिसांना तपासाचे आदेश देण्यात आले होते. स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेचे अधिकारी आरोपींचा शोध घेत होते. ही शोधमोहीम सुरू असतानाच गुन्हे शाखेच्या अधिकार्‍यांनी सीसीटिव्ही फुटेजसह तांत्रिक माहितीवरून विवेक केवट आणि अजय दुबे या दोघांना अटक केली. त्यांच्याकडून पोलिसांनी गुन्ह्यांतील दोन ऍक्टिव्हा बाईक, दोन मोबाईल आणि कॅश असा ८५ हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in