घातक शस्त्रांच्या धाकावर रॉबरी करणार्‍या दुकलीस अटक आरोपी सराईत गुन्हेगार; इतर गुन्ह्यांची नोंद असल्याचे उघड

याप्रकरणी अपहरणासह रॉबरी आणि खंडणीच्या गुन्ह्यांची नोंद होताच पोलिसांनी पळून गेलेल्या आरोपींचा शोध सुरु केला होता.
घातक शस्त्रांच्या धाकावर रॉबरी करणार्‍या दुकलीस अटक आरोपी सराईत गुन्हेगार; इतर गुन्ह्यांची नोंद असल्याचे उघड

मुंबई - घातक शस्त्रांच्या धाकावर रॉबरी करणार्‍या एका दुकलीस पवई पोलिसांनी अटक केली. मोहम्मद शकील ऊर्फ अड्डू जमिल चौधरी आणि आमीर जावेद शेख अशी या दोघांची नावे असून ते दोघेही सराईत गुन्हेगार आहे. त्यांच्याविरुद्ध इतर काही गुन्ह्यांची नोंद असल्याचे उघडकीस आले आहे. अटकेनंतर या दोघांनाही लोकल कोर्टाने शुक्रवार १ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. अंधेरी येथे राहणारा जिशान अब्दुल खालिक हा पवईतील एका खाजगी कंपनीत कामाला आहे. २६ नोव्हेंबरला तो पवईतील एअरटेल डटो सेंटरमध्ये सर्व्हर मेन्टेन्सचे काम करण्यासाठी गेला होता.

पहाटे चार वाजता काम संपल्यानंतर तो त्याच्या घरी जाण्यासाठी निघाला होता. चांदीवली जंक्शनजवळील पेट्रोलपंपासमोर जात असताना तिथे स्कूटरवरुन दोन तरुण आले. काही कळण्यापूर्वीच त्यांनी घातक शस्त्रांचा धाक दाखवून त्याच्याकडे पैशांची मागणी केली होती. त्याने पैसे देण्यास नकार देताच ते दोघेही त्याला घेऊन सहार एअरपोर्ट पर्किंगजवळ आले. तिथे त्याच्यावर चाकूने वार करुन त्यांनी त्याच्याकडील कॅशसहीत मोबाईल घेऊन पलायन केले होते. या घटनेनंतर त्याने पोलिसांना घडलेला प्रकार सांगून दोन्ही आरोपीविरुद्ध तक्रार केली होती.

याप्रकरणी अपहरणासह रॉबरी आणि खंडणीच्या गुन्ह्यांची नोंद होताच पोलिसांनी पळून गेलेल्या आरोपींचा शोध सुरु केला होता. ही शोधमोहीम सुरु असताना सीसीटिव्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीवरुन पोलिसांनी मोहम्मद शकील आणि आमीर शेख या दोघांना अटक केली. चौकशीत त्यांनीच हा गुन्हा केल्याचे उघडकीस आले. तपासात ते दोघेही पवईतील मिलिंदनगरचे रहिवाशी असून त्यांच्याविरुद्ध पवई पोलीस ठाण्यात काही गुन्हे नोंद असल्याचे उघडकीस आले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in