पनवेल-मडगाव दरम्यान दोन अतिरिक्त उत्सव विशेष रेल्वे

रेल्वेने गणेशोत्सव दरम्यान होणारी प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन पनवेल ते मडगाव दरम्यान दोन विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे.
Indian Railway
संग्रहित फोटो
Published on

मुंबई : रेल्वेने गणेशोत्सव दरम्यान होणारी प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन पनवेल ते मडगाव दरम्यान दोन विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे.

मडगाव-पनवेल-मडगाव विशेष (२ सेवा) ०१४२८ ही विशेष गाडी १५ सप्टेंबर रोजी मडगाव येथून सकाळी ९.३० वाजता सुटेल आणि पनवेल येथे त्याच दिवशी रात्री २२.१५ वाजता पोहोचेल. तर ०१४२७ ही विशेष गाडी १५ सप्टेंबर रोजी पनवेल येथून मध्यरात्री २३.४५ वाजता सुटेल आणि मडगाव येथे दुसऱ्या दिवशी सकाळी ११ वाजता पोहोचेल.

या गाडीला पेण, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, झाराप, सावंतवाडी रोड, थिविम आणि करमाळी असे थांबे असतील.

रेल्वे गाडीला १ द्वितीय वातानुकूलित, ३ तृतीय वातानुकूलित, २ तृतीय इकॉनॉमी वातानुकूलित, आठ शयनयान, पाच सामान्य द्वितीय श्रेणी (१ गार्ड ब्रेक व्हॅनसह) आणि एक जनरेटर कार असे डबे असतील.

रेल्वे आरक्षणासाठी विशेष शुल्कासह सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या संकेस्थळावर १० सप्टेंबर रोजी सुरू होईल, अशी माहिती देण्यात आली आहे.

Indian Railway
नवशक्ति-FPJ इको गणेश: पर्यावरणपूरक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करा आणि जिंका मोठी बक्षिसे

सामान्य द्वितीय श्रेणीचे डबे अनारक्षित डबे म्हणून चालवले जातील आणि अतिजलद मेल/एक्स्प्रेस ट्रेनसाठी लागू असलेल्या अनारक्षित सामान्य शुल्कासह यूटीएसद्वारेही तिकिटे काढली जाऊ शकतील.

logo
marathi.freepressjournal.in