मुंबई : बोगस व्हिसाच्या आमिषाने बेरोजगार तरुणांची फसवणूक करणाऱ्या आंतरराज्य टोळीच्या म्होरक्यासह दोघांना गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी कोलकाता येथून अटक केली. पतीत पबन पुलीन हलदार आणि मोहम्मद इलियास अब्दुल सत्तार शेख मंसुरी अशी या दोघांची नावे असून, ते दोघेही कोलकाताचे रहिवाशी आहेत. या दोघांकडून पोलिसांनी ४८२ पासपोर्ट जप्त केल्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक धनश्याम नायर यांनी सांगितले. या दोघांच्या अटकेने या गुन्ह्यांतील अटक आरोपींची संख्या सात झाली आहे.
विदेशात नोकरीचे आमिष दाखवून बेरोजगार तरुणांकडून व्हिसासाठी पैसे घेऊन त्यांची फसवणूक करणारी एक टोळी कार्यरत असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती. या माहितीनंतर पोलिसांनी या आरोपींचा शोध सुरू केला होता.