दहिसर येथे रॉबरीसाठी आलेल्या दुकलीस अटक

दोघांनाही बोरिवलीतील स्थानिक न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे
दहिसर येथे रॉबरीसाठी आलेल्या दुकलीस अटक

मुंबई : दहिसर परिसरात रॉबरीच्या उद्देशाने आलेल्या एका दुकलीस एमएचबी पोलिसांनी अटक केली. अनिकेत सावंत आणि सागर पाटील अशी या दोघांची नावे असून, ते दोघेही रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. त्यांच्याविरुद्ध मुंबईसह ठाणे ग्रामीण पोलीस ठाण्यात अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. नशा करण्यासाठी ते दोघेही गुन्हे करत असल्याचे तपासात उघडकीस आले आहे. शुक्रवारी रात्री उशिरा गुन्हे शाखेचे विशेष पथक परिसरात गस्त घालत होते. यावेळी दहिसर येथील कांदरपाडा, साईबाबानगर परिसरात दोन तरुण एका इमारतीमध्ये रॉबरीच्या उद्देशाने घुसण्याचा प्रयत्न करत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले होते. हा प्रकार लक्षात येताच पोलिसांनी या दोघांनाही पळून जाण्याची कुठलीही संधी न देता शिताफीने ताब्यात घेतले. चौकशीअंती त्यांची नावे अनिकेश सावंत आणि सागर पाटील असल्याचे उघडकीस आले. ते दोघेही अभिलेखावरील गुन्हेगार होते. त्यांचविरुद्ध अर्नाळा, दहिसर, एमएचबी, विरार पोलीस ठाण्यात चोरीसह घरफोडी आणि एनडीपीएस कलमांतर्गत गुन्हे दाखल आहेत. अटकेनंतर या दोघांनाही बोरिवलीतील स्थानिक न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in