घातक शस्त्रांच्या विक्रीसाठी आलेल्या दोघांना अटक

एक देशी बनावटीचे पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसे सापडले
घातक शस्त्रांच्या विक्रीसाठी आलेल्या दोघांना अटक

मुंबई : घातक शस्त्रांची विक्रीसाठी आलेल्या दोघांना कांदिवली पोलिसांसह गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी अटक केली. संतोष हेमंत कुमार आणि फरहान हनीफ कुरेशी ऊर्फ अशी या दोघांची नावे आहेत. या दोघांकडून पोलिसांनी एक देशी बनावटीचे पिस्तूल, एक गावठी कट्टा, तीन जिवंत काडतुसे आणि एक बाईक जप्त केला आहे. अटकेनंतर या दोघांनाही लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. अंधेरी आणि कांदिवली परिसरात काहीजण घातक शस्त्रांची विक्रीसाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीची शहानिशा करण्यासाठी गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी शुक्रवारी रात्री अंधेरीतील मॅकडोनाल्डजवळ साध्या वेशात पाळत ठेवून एका इनोव्हा कारमधून आलेल्या चौघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. यावेळी संतोषकडे पोलिसांना एक देशी बनावटीचे पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसे सापडले. संतोष हा बोरिवलीतील शिंपोली, चिकूवाडी परिसरात राहत असून तो पिस्तूल विक्रीसाठी अंधेरी परिसरात आला होता.

logo
marathi.freepressjournal.in