इलेक्ट्रीक बॅटरी चोरी करणाऱ्या दुकलीस अटक

अटकेने बोरिवली पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या सहा गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे.
इलेक्ट्रीक बॅटरी चोरी करणाऱ्या दुकलीस अटक

मुंबई : रस्त्यावर पार्क केलेल्या वाहनांच्या इलेक्ट्रीक बॅटरी चोरी करणार्‍या एका दुकलीस बोरिवली पोलिसांनी अटक केली. राहुल  नारायण चव्हाण आणि शिवपूजन लालताप्रसाद वर्मा अशी या दोघांची नावे असून, त्यांच्याकडून पोलिसांनी ३ लाख ८५ हजाराचे बारा चोरीच्या बॅटऱ्या जप्त केल्या आहे. नशेसाठी ते दोघेही इलेक्ट्रीक बॅटरी चोरी करत असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक निनाद सावंत यांनी सांगितले. बोरिवली येथे राहणार्‍या तक्रारदाराच्या बाईकची इलेक्ट्रीक बॅटरी काही दिवसांपूर्वी अज्ञात चोरट्याने चोरी केली होती. याप्रकरणी बोरिवली पोलिसांत गुन्हा नोंद होताच पोलिसांनी या आरोपींचा शोध सुरु केला होता. ही शोधमोहीम सुरू असताना तांत्रिक माहितीसह मिळालेल्या माहितीवरुन वरिष्ठ पोलीस निरीक्षक निनाद सावंत यांच्या पथकाने बोरिवली येथून राहुल चव्हाण आणि शिवपूजन वर्मा या दोघांना अटक केली होती. चौकशीत त्यांनीच हा गुन्हा केल्याची कबुली देताना अशाच प्रकारे इतर काही बाईकच्या बॅटऱ्या चोरी केल्याचे सांगितले. त्यानंतर त्यांच्याकडून पोलिसांनी चोरीच्या बारा बॅटऱ्या जप्त केल्या आहेत. त्याची किंमत ३ लाख ८५ हजार इतकी आहे. त्यांच्या अटकेने बोरिवली पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या सहा गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे.

logo
marathi.freepressjournal.in