बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी पुण्यातून दोघांना अटक; शस्त्रांच्या देवाण-घेवाणीत महत्त्वाची भूमिका बजावली

माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येप्रकरणी दोन आरोपींना खंडणी विरोधी पथकाने पुण्यातून अटक केली. आदित्य राजू गुळणकर आणि रफिक नियाज शेख अशी या दोघांची नावे असून ते दोघेही प्रवीण लोणकर आणि रुपेश मोहोळ यांच्या संपर्कात होते.
बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी पुण्यातून दोघांना अटक; शस्त्रांच्या देवाण-घेवाणीत महत्त्वाची भूमिका बजावली
Published on

मुंबई : माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येप्रकरणी दोन आरोपींना खंडणी विरोधी पथकाने पुण्यातून अटक केली. आदित्य राजू गुळणकर आणि रफिक नियाज शेख अशी या दोघांची नावे असून ते दोघेही प्रवीण लोणकर आणि रुपेश मोहोळ यांच्या संपर्कात होते. हत्येसाठी वाापरण्यात येणाऱ्या शस्त्रांच्या देवाण-घेवाणीत त्यांनी महत्त्वाची भूमिका बजाविली होती. अटकेनंतर या दोघांनाही किल्ला न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यांच्या अटकेने या गुन्ह्यांतील अटक आरोपींची संख्या आता अठरा झाली आहे.

गेल्या महिन्यांत दसऱ्याच्या दिवशी वांद्रे येथे बाबा सिद्दीकी यांची तीन अज्ञात व्यक्तीने गोळ्या झाडून हत्या केली होती. दोन दिवसांपूर्वी याच गुन्ह्यांत पोलिसांनी गौरव विलास आपुणे या २३ वर्षांच्या तरुणाला पुण्यातून अटक केली होती. त्यानेच हत्येतील मारेकऱ्यांना शस्त्रे चालविण्याचे प्रशिक्षण दिले होते.

अटक केलेले दोघे पुण्यातील कर्वेनगरचे रहिवाशी आहेत. ते दोघेही या आरोपी प्रविण लोणकर आणि रुपेश मोहोळ यांच्या संपर्कात होते. गुन्ह्यांत वापरण्यात आलेले ९ एमएम बनावटीचे पिस्तूल आणि राऊंड त्यांच्याकडे देण्यात आले होते. ते शस्त्र या दोघांनी मारेकऱ्याला दिले होते. ते पिस्तूल पोलिसांनी जप्त केले आहे.

logo
marathi.freepressjournal.in