रॉबरीसह खंडणीच्या गुन्ह्यांत महिलेसह दोघांना अटक

सहार पोलिसांकडे तक्रार नोंदवली
रॉबरीसह खंडणीच्या गुन्ह्यांत महिलेसह दोघांना अटक

मुंबई : रॉबरीसह खंडणीच्या गुन्ह्यांत एका महिलेसह दोघांना सहार पोलिसांनी अटक केली. स्नेहल सुरेश गायकवाड आणि दयानंद सुभाष वाभळे अशी या दोघांची नावे आहेत. वसईत येथे राहणारी तक्रारदार महिला जुलै महिन्यांत मोहरमनिमित्त कुटुंबियांसोबत शारजा येथे गेली होती. यावेळी तिने तिच्याकडील एका सोन्याची मूर्तीची पावडर बनवून घेतली होती. ऑगस्ट महिन्यांच्या पहिल्या आठवड्यात मुंबई विमानतळावर आल्यानंतर टॉयलेटमध्ये गेल्यावर साफसफाई करणाऱ्या महिलेने तिच्याकडील सोन्याच्या पावडरची पिशवी कचऱ्याच्या डब्यात फेकून दिली. त्यानंतर तिथे आलेल्या दोन पुरुष सुरक्षारक्षकांनी तिला धमकावले. अखेर सोन्याची अंगठी देऊन तिने आपली सुटका करून घेतली. हा प्रकार पतीला सांगितल्यावर त्यांनी दुसऱ्या दिवशी सहार पोलिसांकडे तक्रार नोंदवली. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर पोलिसांनी या आरोपीविरुद्ध रॉबरीसह खंडणीच्या गुन्ह्यांची नोंद केली होती.

logo
marathi.freepressjournal.in