गांजा तस्करीच्या गुन्ह्यांतील मुख्य आरोपीसह दोघांना अटक

तिघांविरुद्ध नंतर पोलिसांनी आरोपपत्र सादर केले आहे. सध्या ते तिघेही सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत.
गांजा तस्करीच्या गुन्ह्यांतील मुख्य आरोपीसह दोघांना अटक

मुंबई : गांजा तस्करीच्या गुन्ह्यांतील मुख्य आरोपीसह दोघांना घाटकोपर अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या अधिकार्‍यांनी अटक केली. लक्ष्मीकांत रामा प्रधान ऊर्फ लक्ष्मीभाई आणि विद्याधर वृंदावन प्रधान अशी या दोघांची नावे आहेत. अटकेनंतर या दोघांनाही किल्ला कोर्टाने बुधवार २० डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. यापूर्वी याच गुन्ह्यांत तिघांना पोलिसांनी अटक केली असून, त्यांच्याकडून ३ कोटी ८५ लाख रुपयांचा १८२० किलो गांजा आणि टेम्पो जप्त केला होता. १२ फेब्रुवारी २०२१ रोजी विक्रोळीतील पूर्व दुतग्रती महामार्गावर काहीजण गांजा घेऊन येणार असल्याची माहिती घाटकोपर युनिटला मिळाली होती.

या माहितीवरुन पोलिसांनी तिथे साध्या वेशात पाळत ठेवून आकाश सुभाष यादव आणि दिनेशकुमार सजीवन सरोज या दोघांना अटक केली. त्यांच्याकडून पोलिसांनी २५ लाखांचा टेम्पो, ३ कोटी ६० लाख रुपयांचा १८२० किलो गांजाचा साठा जप्त केला आहे. याच गुनह्यांत नंतर पोलिसंनी संदीप भाऊ सातपुते याला विरार येथून अटक केली. या तिघांविरुद्ध नंतर पोलिसांनी आरोपपत्र सादर केले आहे. सध्या ते तिघेही सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in