अंधेरीतून दोन बांगलादेशी नागरिकांना अटक व कोठडी

बांगलादेशातील गरिबीसह बेरोजगारीला कंटाळून ते भारतात पळून आल्याचे तपासात उघडकीस आले आहे.
अंधेरीतून दोन बांगलादेशी नागरिकांना अटक व कोठडी

मुंबई - अंधेरीतून दोन बांगलादेशी नागरिकांना अंधेरी पोलिसांनी अटक केली. अब्दुल अव्यल अन्सार शेख आणि रहिम मोहम्मदअली शेख अशी या दोघांची नावे आहेत. अटकेनंतर या दोघांनाही लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. बांगलादेशातील गरिबीसह बेरोजगारीला कंटाळून ते भारतात पळून आल्याचे तपासात उघडकीस आले आहे. अंधेरी परिसरात काही बांगलादेशी नागरिक वास्तव्यास असून ते नोकरीनिमित्त अंधेरीतील सहार रोड आणि नवीन नागरदास रोड परिसरात येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीनंतर बुधवारी पोलिसांनी गोखले ब्रिजजवळ अब्दुल शेख या २६ वर्षांच्या तरुणाला ताब्यात घेतले. चौकशीत तो बांगलादेशी नागरिक असल्याचे उघडकीस आले. गेल्या एक वर्षापासून तो मुंबईत वास्तव्यास होता. दुसऱ्या कारवाईत पोलिसांनी रहिम शेख याला अटक केली. तो मूळचा ढाकाचा रहिवाशी असून मंगळवारी तो पिंकी सिनेमागृहाजवळ आला होता. ही माहिती मिळताच त्याला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर या दोघांनाही वांद्रे येथील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे. सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर त्यांना पुन्हा बांगलादेशात पाठविण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

logo
marathi.freepressjournal.in