दोन बंधूंवर सिमेंट पेव्हर ब्लॉकने प्राणघातक हल्ला

या हल्ल्यामागील कारण समजू शकले नाही. ही घटना रविवारी रात्री साडेदहा वाजता शीव येथील प्रतिक्षानगर, न्यू भारतनगर, बालवाडी कंपाऊंड गेटजवळ घडली
दोन बंधूंवर सिमेंट पेव्हर ब्लॉकने प्राणघातक हल्ला

मुंबई : दोन बंधूंवर त्यांच्याच परिचित व्यक्तीने सिमेंट पेव्हर ब्लॉकने हल्ला केल्याची घटना वडाळा परिसरात घडली. या हल्ल्यात जसपालसिंह सुरवीरसिंह पुंढीर आणि हरपालसिंह सुरवीरसिंह पुंढीर हे दोघेही जखमी झाले असून त्यांच्यावर शीव रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी कृष्णा देवेंद्र या मारेकऱ्याविरुद्ध वडाळा टीटी पोलिसांनी हत्येचा प्रयत्नाचा गुन्हा नोंदविला आहे.

या हल्ल्यामागील कारण समजू शकले नाही. ही घटना रविवारी रात्री साडेदहा वाजता शीव येथील प्रतिक्षानगर, न्यू भारतनगर, बालवाडी कंपाऊंड गेटजवळ घडली. कृष्णा देवेंद्रने मद्यप्राशन केल्यावर जयपालसिंह आणि हरपालसिंह एकत्र असताना त्याने या दोघांवर पेव्हर ब्लॅकने हल्ला केला. त्यात त्या दोघांनाही गंभीर दुखापत झाली होती. ही माहिती मिळताच सुरवीसिंह व त्यांच्या कुटुंबियांनी दोघांनाही शीव रुग्णालयात दाखल केले.

या दोघांवर तिथे अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत. ही माहिती मिळताच वडाळा टी टी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. याप्रकरणी सुरवीरसिंह यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी कृष्णा देवेंद्रविरुद्ध हत्येचा प्रयत्नाचा गुन्हा नोंदविला आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in