पंजाबच्या दोन बंधूंचे अपहरण करून लुटमार

मुंबईतून त्यांना नवी मुंबईत आणल्यांनतर आरोपींनी त्यांना लोखंडी रॉडने जिवे मारण्याची धमकी देत त्यांच्याकडील ११ लाख २९ लाखांचा मुद्देमाल घेऊन आरोपींनी पलायन केले होते.
पंजाबच्या दोन बंधूंचे अपहरण करून लुटमार

मुंबई : पंजाबच्या दोन बंधूंचे अपहरण करून लुटमार करणार्‍या एका टोळीचा साकिनाका पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी आठ आरोपींना वेगवेगळ्या परिसरातून पोलिसांनी अटक केली. हिमांशू अशोक गुप्ता, सौरभ मनोहर खरात, प्रतिक विजय शिंदे, दिने नारायण सातपुते, विशाल जयसिंग थोरात, अनिल मनोहर शेटे, महेश तुकाराम गरुड आणि राजीव ऊर्फ करण सुरेश वर्मा अशी या आठजणांची नावे आहेत. अटकेनंतर या सर्वांना अंधेरीतील लोकल कोर्टाने गुरुवार १४ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

इटलीत स्थायिक होण्यासाठी व्हिसा मिळवनू देण्याचा बहाणा करुन या दोघांचे अपहरण करण्यात आल्याचे तपासात उघडकीस आले आहे. अभिषेक विपनकुमार हा मूळचा पंजाबचा रहिवाशी असून काही दिवसांपूर्वीच तो त्याचा भाऊ हिमांशू कुमारसोबत मुंबईत आला होता. त्याला इटली देशात कायमचे स्थायिक व्हायचे होते. त्यासाठी त्याला सबंधित आरोपींनी मुंबईत बोलावून घेतले होते. ६ डिसेंबरला त्याच्यासह त्याच्या भावाचे एका टोळीने साकिनाका येथील नेस्ट एन रेस्ट हॉटेल परिसरातून अपहरण केले होते.

मुंबईतून त्यांना नवी मुंबईत आणल्यांनतर आरोपींनी त्यांना लोखंडी रॉडने जिवे मारण्याची धमकी देत त्यांच्याकडील ११ लाख २९ लाखांचा मुद्देमाल घेऊन आरोपींनी पलायन केले होते. ११ हजार ६०० अमेरिकन डॉलर, १०० युरो, दोन तोळे सोन्याची चैन, दोन मोबाईल आदींचा समावेश होता. या घटनेनंतर ते दोघेही भाऊ प्रचंड घाबरले होते. हॉटेलमध्ये आल्यानंतर त्यांनी घडलेला प्रकार साकिनाका पोलिसांना सांगितला होता. त्यानंतर अभिषेक कुमार याच्या जबानीवरुन पोलिसांनी आरोपीविरुद्ध कट रचून अपहरण करुन रॉबरी केल्याप्रकरणी गुन्हा नोंदविला होता.

logo
marathi.freepressjournal.in