बाईक चोरीच्या गुन्ह्यांतील दोन गुन्हेगारांना अटक

अजानअली रहमतअली अन्सारी आणि अब्दुल माजिद मोहम्मद साबीर अन्सारी अशी या दोघांची नावे आहेत.
बाईक चोरीच्या गुन्ह्यांतील दोन गुन्हेगारांना अटक

मुंबई : बाईक चोरीच्या गुन्ह्यांतील दोन रेकॉर्डवरील गुन्हेगारांना माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलिसांनी अटक केली. अजानअली रहमतअली अन्सारी आणि अब्दुल माजिद मोहम्मद साबीर अन्सारी अशी या दोघांची नावे आहेत. या दोघांच्या अटकेने बाईक चोरीच्या चौदा गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले असून, त्यांच्याकडून चोरीचे आठ बाईक जप्त केले आहेत. २९ ऑगस्ट रोजी तक्रारदाराची मुखाफिरखाना येथील साबू सिद्धीक रोड, कुशल इंटरप्रायजेससमोर पार्क केलेली एक बाईक अज्ञात चोरट्याने चोरी करून पळवून नेली होती. याप्रकरणी एमआयए मार्ग पोलिसात बाईक चोरीचा गुन्हा नोंद होताच पोलिसांनी पळून गेलेल्या आरोपीचा शोध सुरू केला होता. सीसीटिव्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीवरून पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला असताना या गुन्ह्यांतील काही आरोपी नाशिकच्या मालेगाव परिसरात वास्तव्यास असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी तिथे सलग पाच दिवस वेशांतर करुन त्यांचा शोध सुरू केला होता. यावेळी अजानअली आणि अब्दुल या दोघांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले. चौकशीत त्यांचा या बाईक चोरीच्या गुन्ह्यांत सहभाग उघडकीस आले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in