चोरीच्या गुन्ह्यातील दोन गुन्हेगारांना अटक

या पाचही गुन्ह्यांतील मोबाईलसह बाईक असा सुमारे एक लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
चोरीच्या गुन्ह्यातील दोन गुन्हेगारांना अटक

मुंबई : चोरीच्या गुन्ह्यातील दोन रेकॉर्डवरील गुन्हेगारांना वर्सोवा पोलिसांच्या एका विशेष पथकाने अटक केली. विजय पिंटू मोरे आणि राकेश सत्तू शहा अशी या दोघांची नावे आहेत. या दोघांच्या अटकेने पाच गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले असून, या गुन्ह्यांतील चोरीचे मोबाईल बाईक पोलिसांनी जप्त केल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश पवार यांनी सांगितले. अटकेनंतर या दोघांनाही अंधेरीतील स्थानिक न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. मंगळवारी ६ फेब्रुवारीला अंधेरीरीतील चार बंगला, गुड शेफर्ड चर्च, मच्छी मार्केटजवळ एका तरुणाचा आयफोन बाईकवरुन आलेल्या चोरट्याने पळवून नेला होता. याप्रकरणी मोबाईल चोरीच्या गुन्ह्यांची नोंद होताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश पवार यांच्या पथकातील ज्ञानेश्‍वर जाधव, अंमलदार गोसावी, रकटे, किंजळकर, थोरात, गणेश हंचनाळे यांनी तपासाला सुरुवात केली होती. परिसरातील सीसीटिव्ही फुटेजवरुन पोलिसांनी आरोपींची ओळख पटविली होती. या फुटेजसह मिळालेल्या माहितीवरून या पथकाने पळून गेलेल्या विजय मोरे आणि राकेश शहा या दोघांना अटक केली होती. त्यांच्या अटकेने वर्सोवा, अंबोली, डी. एन नगर आणि जुहू पोलीस ठाण्यातील पाचहून अधिक गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना आले. या पाचही गुन्ह्यांतील मोबाईलसह बाईक असा सुमारे एक लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.

logo
marathi.freepressjournal.in