सात वर्षांपासून वॉण्टेड दोन गुन्हेगारांना अटक

जालना येथे घातक शस्त्रांचा धाक दाखवून रॉबरी झाली होती
सात वर्षांपासून वॉण्टेड दोन गुन्हेगारांना अटक

मुंबई : सात वर्षांपासून वॉण्टेड असलेल्या दोन रेकॉर्डवरील गुन्हेगारांना वांद्रे युनिटच्या गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी अटक केली. गणेश पांडुरंग भोसले ऊर्फ महााज आणि संजू सुनका डोकरे ऊर्फ अमीत ऊर्फ दद्दू ऊर्फ सुका अशी या दोघांची नावे आहेत. या दोघांविरुद्ध मुंबईसह महाराष्ट्र, तेलंगणा, आंधप्रदेश, उत्तरप्रदेशात अनेक रॉबरीच्या गुन्ह्यांची नोंद असल्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक दया नायक यांनी सांगितले. अटकेनंतर या दोघांनाही पुढील चौकशीसाठी जालनाच्या बदनापूर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले होते. सात वर्षांपूर्वी जालना येथे घातक शस्त्रांचा धाक दाखवून रॉबरी झाली होती.

याप्रकरणी बदनापूर पोलिसांनी कट रचून गंभीर दुखापत करुन रॉबरी केल्याप्रकरणी गुन्हा नोंदवून आरोपींचा शोध सुरू केला होता. या गुन्ह्यांत गणेश भोसले आणि संजय डोकरे हे गेल्या सात वर्षांपासून फरार होते. त्यांचा जालनासह इतर शहरातील पोलीस शोध घेत होते. ते स्वतचा मोबाईल बदलून विविध ठिकाणी वास्तव्य करुन राहत होते. या कालावधीत त्यांनी अनेक गुन्हे केले होते.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in