मुलुंड, कांदिवलीत इमारतीवरून पडून दोघांचा मृत्यू

दुसऱ्या घटनेत कांदिवलीत एका बांधकाम साइटवर काम करणाऱ्या दुरई मणिकम मुथ्युस्वामी या वरिष्ठ सुपरवायझरचा मृत्यू झाला.
मुलुंड, कांदिवलीत इमारतीवरून पडून दोघांचा मृत्यू

मुंबई : मुलुंड आणि कांदिवलीत इमारतीवरून पडून दोघांचा मृत्यू झाला. राजकुमार केश्‍वर राजभर आणि दुरई मणिकम मुथ्युस्वामी अशी त्यांची नावे आहेत. याप्रकरणी दोन पोलिसांनी दोन स्वतंत्र सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्यांची नोंद केली आहे.

केश्‍वर काशिराज राजभर हे मूळचे उत्तर प्रदेशचे रहिेवाशी असून सध्या नाहूर येथे राहतात. मृत राजकुमार हा त्यांचा मोठा मुलगा आहे. गेल्या सहा महिन्यांपासून केश्‍वर व त्यांचा मुलगा राजकुमार हा मोहित मिश्रा यांच्या कॉन्ट्रक्टर साइटवर काम करतात. सध्या त्याची साइट मुलुंडच्या सुमीत श्रीजी अर्सेसियल इमारतीमध्ये सुरू आहे. त्यांना तिथे मोहितने कामासाठी पाठविले होते. २२ नोव्हेंबरला पेटिंगचे काम संपल्यानंतर राजकुमार हा त्याच्या सहकाऱ्यासोबत इमारतीच्या रूममध्ये ठेवलेले बांबू खाली उतरविण्याचे काम करत होता. सकाळी साडेअकरा वाजता काम करत असताना राजकुमारचा तोल गेला आणि तो तिसऱ्या मजल्यावरून खाली पडला. त्याला शीव रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिथेच उपचार सुरू असताना सायंकाळी सहा वाजता त्याचा मृत्यू झाला.

दुसऱ्या घटनेत कांदिवलीत एका बांधकाम साइटवर काम करणाऱ्या दुरई मणिकम मुथ्युस्वामी या वरिष्ठ सुपरवायझरचा मृत्यू झाला. गुरुवारी सकाळी दुरई हा त्याच्या दोन कामगारांसोबत पीटी लेबलचे काम करत होता. यावेळी चौथ्या मजल्यावरून पीटी स्टँड वायर खाली टाकताना त्याचा तोल गेला आणि तो खाली पडला होता. त्याला सेव्हन स्टार मल्टीस्पेशलिटी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिथे त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले. ही माहिती मिळताच समतानगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. याप्रकरणी कांदिवली आणि मुलुंड पोलिसांनी दोन स्वतंत्र गुन्ह्यांची नोंद करून तपास सुरू केला आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in