शहरात दोन अपघातात दोन वयोवृद्धांचा मृत्यू

रिक्षातून गोवंडीच्या दिशेने जाताना गोवंडी ब्रिज सिग्नलजवळ एका कारने त्यांच्या रिक्षाला धडक दिली
शहरात दोन अपघातात दोन वयोवृद्धांचा मृत्यू

मुंबई : शहरात दोन वेगवेगळ्या अपघातात एका महिलेसह दोन वयोवृद्धांचा मृत्यू झाला. गेनाबाई मेवालाल गौड आणि सखाराम किसन भदरगे अशी या दोघांची नावे आहेत. याप्रकरणी नेहरूनगर आणि गोवंडी पोलिसांनी दोन स्वतंत्र अपघाताची नोंद केली आहे. गेनाबाई (६०) आणि तिची मुलगी सायंकाळी सात वाजता ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवरून रस्ता क्रॉस करत होती. यावेळी भरवेगात जाणाऱ्या एका कारची धडक लागून गेनाबाई ही जखमी झाली होती. तिला शीव रुग्णालयात दाखल केले असता तिच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु करण्यात आले. तिथे उपचार सुरु असताना मंगळवारी पहाटे चार वाजता तिचा मृत्यू झाला. दुसऱ्या अपघातात, सखाराम हे रविवारी ते त्यांच्या मुलासोबत गोवंडीतील त्यांच्या मुलीकडे जात होते. रिक्षातून गोवंडीच्या दिशेने जाताना गोवंडी ब्रिज सिग्नलजवळ एका कारने त्यांच्या रिक्षाला धडक दिली. या अपघातात सखाराम हे गंभीररीत्या जखमी झाल्याने त्यांना शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले.

logo
marathi.freepressjournal.in