अपघातात जखमी झालेल्या दोन वयोवृद्धांचा मृत्यू

त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते
अपघातात जखमी झालेल्या दोन वयोवृद्धांचा मृत्यू
Published on

मुंबई : अपघातात जखमी झालेल्या दोन वयोवृद्धाचा अपघात झाल्याची घटना कांदिवली आणि चेंबूर परिसरात घडली. मृतांमध्ये एकाची ओळख पटली तर दुसर्‍या वयोवृद्धाची ओळख पटली नाही. याप्रकरणी आरसीएफ आणि समतानगर पोलिसांनी दोन स्वतंत्र अपघाताची नोंद करून अपघातानंतर पळून गेलेल्या वाहनचालकाचा शोध सुरू केला आहे. रविवारी ३ सप्टेंबरला गुलाम शेख हे गावी जात असल्याचे सांगून त्यांच्या घरातून निघून गेले. रात्री नऊ वाजता त्यांना आरसीएफ पोलिसांचा फोन आला, यावेळी पोलिसांनी त्याला त्याच्या वडिलांचा अपघात झाल्याचे सांगितले. शीव रुग्णालयात गेल्यानंतर त्याला त्याचे वडिल गुलाम यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु असल्याचे समजले; मात्र उपचारादरम्यान बुधवारी दुपारी दिड वाजता त्यांचा मृत्यू झाला. इस्टर्न फ्रीवे, पांजरपोळ, बोगद्याजवळ गावी जाण्यासाठी बसची वाट पाहत असताना एका अज्ञात वाहनाने त्यांना धडक दिल्याचे तपासात उघडकीस आले आहे.

दुसरा अपघात सोमवारी रात्री साडेनऊ ते साडेदहाच्या सुमारास कांदिवलीतील वेस्टर्न एक्सप्रेस हायवे, साईधाम मंदिराजवळील उत्तर वाहिनीवर झाला. मृत ६५ वर्षांचे वयोवृद्ध रात्री रस्ता क्रॉस करत होता. यावेळी भरवेगात जाणार्‍या एका बाईकस्वाराने त्याला धडक दिली होती. अपघातात ते गंभीररीत्या जखमी झाले होते. जखमी वयोवृद्धाला कुठलीही वैद्यकीय मदत किंवा अपघाताची माहिती पोलिसांना न देता आरोपी बाईकस्वार तेथून पळून गेला होता. एका रिक्षाचालकाच्या निदर्शनास हा प्रकार येताच त्याच्यासह इतरांनी जखमी झालेल्या वयोवृद्धाला तातडीने कांदिवलीतील शताब्दी रुग्णालयात दाखल केले. तिथे त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते.

logo
marathi.freepressjournal.in