मुंबई : विदेशी चलनासह दोन विदेशी नागरिकांना छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर हवाई गुप्तचर विभागाच्या अधिकाऱ्यांनी अटक केली. माकोटो टॅम आणि सुश्री गुण्यपुनिसा फुनासे अशी या दोघांची नावे आहेत. माकोटो हा थायलंड तर सुश्री ही महिला जपानची नागरिक असून, अटकेनंतर या दोघांनाही लोकल कोर्टाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. या दोघांकडून या अधिकाऱ्यांनी १ लाख ४१ हजाराचे अमेरिकन डॉलर जप्त केले असून, त्याची किंमत एक कोटी पंधरा लाख रुपये आहे. शनिवारी माकोटो टॅम आणि सुश्री फुनासे हे बँकॉंकला जाण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर आले होते. त्यांच्याकडे विदेशी चलन असल्याची माहिती प्राप्त होताच हवाई गुप्तचर विभागाने या दोघांनाही चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. त्यांच्या बॅगेची तपासणी केल्यानंतर त्यांच्याकडे या अधिकाऱ्यांना १ लाख ४१ हजार ५०० रुपयांचे अमेरिकन डॉलर सापडले.