सांताक्रुझ व कांदिवलीत दोन अल्पवयीन मुलींचा विनयभंग, गुन्हा दाखल होताच एकाला अटक; दुसऱ्याचा शोध सुरू

सांताक्रुझ आणि कांदिवली येथे दोन अल्पवयीन मुलींचा विनयभंग झाल्याची घटना उघडकीस आली आहे.
सांताक्रुझ व कांदिवलीत दोन अल्पवयीन मुलींचा विनयभंग, गुन्हा दाखल होताच एकाला अटक; दुसऱ्याचा शोध सुरू
Published on

मुंबई : सांताक्रुझ आणि कांदिवली येथे दोन अल्पवयीन मुलींचा विनयभंग झाल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी वाकोला आणि समतानगर पोलिसांनी दोन विनयभंगासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हे दाखल करुन एका आरोपीला अटक केली तर दुसर्यारचा पोलीस शोध घेत आहेत.

पहिल्या गुन्ह्यांतील तक्रारदार महिला सांताक्रुझ येथे राहत असून तिला पाच वर्षांची मुलगी आहे. याच परिसरात समीर हा राहत असून तो तिच्या परिचित आहे. रविवारी दुपारी दोन वाजता ही मुलगी घरासमोरच खेळत होती. यावेळी समीरने मुलीला पाहून त्याची पॅण्ट काढून तिच्यासमोर अश्लीील चाळे करण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार या मुलीकडून समजताच या महिलेने त्याला जाब विचारण्याचा प्रयत्न केला. मात्र तो तेथून निघून गेला. त्यानंतर तिने घडलेला प्रकार वाकोला पोलिसांना सांगून समीरविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर त्याच्याविरुद्ध पोलिसांनी विनयभंगासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होण्यापूर्वीच तो पळून गेल्याने त्याचा पोलिसाकडून शोध सुरु आहे. दुसऱ्या गुन्ह्यांतील तक्रारदार मुलगी सतरा वर्षांची असून ती कांदिवली येथे राहते. शनिवारी रात्री दहा वाजता ती तिच्या घराच्या दिशेने जात होती. यावेळी तिचा परिचित सोमनाथ हा तिचा पाठलाग करत असल्याचे दिसून आले. त्याकडे तिने दुर्लक्ष केले. काही वेळानंतर तो तिच्या जवळ आला आणि त्याने तिचा हात पकडून स्वत:कडे ओढण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्याने तिच्याशी अश्लील वर्तन करून तिचा विनयभंग केला होता. तिने आरडओरड केल्यानंतर तिथे जमा झालेल्या लोकांनी त्याला पकडले. कॉल केल्यानंतर तिथे समतानगर पोलीस आले होते.

logo
marathi.freepressjournal.in