Mumbai : मुंबईत १३ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार; २ अल्पवयीन मुलांना केली अटक

मुंबईतील (Mumbai) माटुंगा शाळेमध्ये ८वीत शिकणाऱ्या मुलीवर तिच्याच वर्गमित्रांकडून लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली
Mumbai : मुंबईत १३ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार; २ अल्पवयीन मुलांना केली अटक

मुंबईतील (Mumbai) माटुंगा शाळेमध्ये ८वीमध्ये शिकणाऱ्या एका मुलीचा लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली. मिळालेल्या माहितीनुसार, लैंगिक अत्याचार करणारी मुले ही अल्पवयीन असून मुलीचेच वर्गमित्र असल्याचे सांगितले आहे. माटुंगा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलांना अटक केली असून त्यांच्यावर आयपीसी कलम ३७६ (डी) आणि पोक्सो कायद्यांतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे.

सदर घटना ही २८ नोव्हेंबरला संध्याकाळी ५ वाजताच्या सुमारास घडली. अस्वस्थ वाटत असल्याने पीडित मुलगी वर्गातच थांबली होती. याचा गैरफायदा घेत वर्गातील दोन अल्पवयीन मुलांनी दरवाजा लावून घेत तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. कोणाकडे घडलेल्या प्रसंगाबाबत भाष्य केल्यास ठार मारण्याची धमकी दिली. दोघांच्या तावडीतून सुटका होताच विद्यार्थिनीने ती घरी आली. मुलगी शांत राहिल्यामुळे तिच्या वहिनीने विश्वासात घेत चौकशी केली. त्यानंतर मुलीने सर्व घडलेला प्रकार हा तिला सांगितला. अखेर बुधवारी ३० तारखेला माटुंगा पोलीस ठाणे गाठले. पोलिसांनी जबाब नोंदवत, त्या दोन विद्यार्थ्यांविरोधात लैंगिक अत्याचार आणि पोक्सोअंतर्गत गुन्हा नोंदवला. पोलिसांनी सांगितले की, या घटनेमुळे विद्यार्थिनीला जबरदस्त मानसिक धक्का बसला आहे. तिचे समुपदेशन करण्यात आले आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in