मंत्रालयातील विनयभंगप्रकरणी दोन अधिकारी निलंबित

आरोपी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पीडित अधिकारी महिलेला ‘आपल्याला कंटाळा आला असून, तुम्ही गाणे गाऊन दाखवा,’ अशी मागणी केली
मंत्रालयातील विनयभंगप्रकरणी दोन अधिकारी निलंबित

मंत्रालयातील इतर मागास बहुजन कल्याण विभागातील महिला अधिकाऱ्याच्या विनयभंगप्रकरणी दोन अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे.

उच्चस्तरीय सूत्रांनी सांगितले की, आरोपी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पीडित अधिकारी महिलेला ‘आपल्याला कंटाळा आला असून, तुम्ही गाणे गाऊन दाखवा,’ अशी मागणी केली. ही घटना घडली तेव्हा इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे उपसचिवही उपस्थित होते. या प्रकरणी विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी सरकारला संबंधित अधिकाऱ्यांविरोधात कठोर कारवाईचे आदेश दिले. त्यानंतर या दोन्ही अधिकाऱ्यांना निलंबित केले. सरकारच्या या निर्णयाचे डॉ. गोऱ्हे यांनी स्वागत केले आहे, मात्र सरकार या निलंबनाची जोपर्यंत अधिसूचना काढत नाही आणि कठोर कारवाई करत नाही,तोवर या घटनेकडे आपले बारीक लक्ष असेल, असे गोऱ्हे यांनी सांगितले. या प्रकरणी संबंधित दोषी वरिष्ठ अधिकाऱ्यांना तातडीने मुक्त करावे. त्यामुळे ही चौकशी निर्धास्त होऊ शकेल. संबंधित पीडित अधिकारी उपसंचालक या पदावर काम करते. १८ ऑक्टोबर रोजी उपसचिव पदावरील पुरुष अधिकाऱ्याने तिचा विनयभंग केला. त्यानंतर पीडित महिला अधिकाऱ्याने तातडीने संबंधित विभागाच्या मंत्र्याकडे लेखी तक्रार केली, मात्र दोन्ही मंत्र्यांनी याबाबत कोणतीच कारवाई केली नाही. मी याबाबत माहिती घेऊन सरकारकडे कारवाईची मागणी केली, असे गोऱ्हे यांनी सांगितले. दरम्यान, या कारवाईचे भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी स्वागत केले आहे. मी संबंधित महिला अधिकाऱ्याशी चर्चा केली. तसेच संबंधित मंत्र्याशी चर्चा केली असून, एक-दोन दिवसांत चौकशी पूर्ण होणार आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in