कलिना येथे दोन वेगवेगळ्या घटनेत दोघांचा मृत्यू

रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले
कलिना येथे दोन वेगवेगळ्या घटनेत दोघांचा मृत्यू

मुंबई : सांताक्रुझ पूर्व कलिना एअर इंडिया कॉलनी, कलिना मस्जिद जवळ गटार साफ करत असतात अनोळखी व्यक्तीला उघड्या वायरींचा झटका बसला. त्याला जवळील दुर्गा नसिॅग होममध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले; मात्र रुग्णालयात दाखल करण्यापूर्वी मृत्यू झाल्याचे रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले, तर कलिना येथील तलावात खोल पाण्याचा अंदाज न आल्याने १३ वर्षीय मुलाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. दरम्यान, या दोन्ही प्रकरणाचा स्थानिक पोलीस पुढील तपास करीत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

मुंबईत गेल्या आठवड्यापासून पावसाची दमदार इनिंग सुरू असून, पडझडीचे सत्र सुरू आहे. रविवारी सांताक्रुझ पूर्व कलिना कुर्ला रोड, कलिना मस्जिद जवळ, एअर इंडिया कॉलनी येथील घरात पाणी येत असल्याने गटार साफ करण्यासाठी एक व्यक्ती गटारात उतरला. गटारात वायरींग होती आणि ती वायरिंग त्याने पकडली आणि त्याला शॉक लागल्याचे एच पूर्व विभागाच्या सहाय्यक आयुक्त स्वप्नजा क्षीरसागर यांनी सांगितले. दरम्यान, त्याला जवळील दुर्गा नसिॅग होममध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले; मात्र रुग्णालयात दाखल करण्यापूर्वी त्यांचा मृत्यू झाल्याचे रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले.

सांताक्रूझ पूर्व येथील मुंबई विद्यापीठ, विद्यानगरी गेट क्र ०१, डक पॉईंट, कलीना येथील तलावात खोल पाण्याचा अंदाज न आल्याने अकबाल मिस्लाम मन्सुरी (१३) हा दुपारी २.४६ वाजता बुडाला. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत मुलाला बाहेर काढत व्ही. एन. देसाई रुग्णालयात दाखल केले; मात्र रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले.

logo
marathi.freepressjournal.in