दोन अपघातात कॉलेज तरुणीसह दोघांचा मृत्यू

दोन अपघातात कॉलेज तरुणीसह दोघांचा मृत्यू

एका टेम्पोने त्यांच्या कारला धडक दिली. जखमी तिघांनाही रुग्णालयात दाखल केले

मुंबई : शहरात दोन अपघातात एका १५ वर्षांच्या कॉलेज तरुणीसह दोघांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये रिया विजयलाल गुप्ता आणि मोहम्मद मोदस्सीर इम्रान यांचा समावेश आहे. पहिला अपघात मंगळवारी सकाही दहा वाजता मुलुंड येथील पूर्व दुतग्रती महामार्गावरील ऐरोली ब्रिजवर झाला. मोहम्मद मोदस्सीर इम्रान हे आपल्या दोन मित्रांसह कारने जात असताना डम्परचालकाने अचानक ब्रेक लावल्याने त्यांनी कार उजवीकडे वळवली, मात्र समोरून येणाऱ्या एका टेम्पोने त्यांच्या कारला धडक दिली. जखमी तिघांनाही रुग्णालयात दाखल केले असता, मोहम्मद मोदस्सीर इम्रान यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले तर इतर दोघांवर उपचार सुरू आहेत. दुसऱ्या अपघातात रिया गुप्ता ही कॉलेजवरून घरी येत होती. मात्र सोमवारी सायंकाळी रस्ता क्रॉस करताना माटुंगा येथे तिला बुलेटने जोरात धडक दिली. त्यामुळे ती बसच्या चाकाखाली आली. त्यात तिचा जागीच मृत्यू झाला.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in